वडोदा वनक्षेत्रात वनक्षेत्रपाल अधिकारी कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी. ... वन्य प्रेमीची, मागणी
वडोदा वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण यांची बदली दिनांक 3/10/2021 या तारखेला झालेली आहे.गेल्या सात महिन्यांपासून वडोदा वनक्षेत्राला अतिरिक्त म्हणून ए आर बच्छाव यांच्याकडे पदभार आहे. त्यामुळे कामावर विपरीत परिणाम होत आहे.कायम अधिकारी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. मात्र कर्मचाऱ्यांना सोन्याचे दिवस असल्याचे बोलले जात आहे.
वडोदा वनक्षेत्रचा विस्तार15000 हेक्टर मध्ये आहे.खूप मोठे जंगल क्षेत्र विखुरलेलं आहे.या वन क्षेत्रांमध्ये वन्यजीव पशु, पक्षी ,प्राणी यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे वडोदा वनपरिक्षेत्र हे टायगर कॅरिडोर मान्यता मिळाली आहे.या वन क्षेत्रांमध्येआठ ते दहा वाघांचे वास्तव्य आहे. या वन क्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांच्या शिकारीचे मोठे रॅकेट असल्या बाबत चर्चेचा विषय बनलेला आहे.वन्य प्राण्यांचे मास व अवयव विकणारी टोळी सक्रिय समजते.डोलारखेडा परिसरात वाघाला जखमी करण्याचे प्रकार झाले होते, टाकळी परिसरात येथे सुद्धा जखमी केल्याचे प्रकार झालेले आहेत थैरोळा येथे इलेक्ट्रिक शॉक लावून वाघ मारण्याचा प्रकार झालेला आहे. हलखेडा येथे वाघाची शिकार करण्यात आली होती.
वडोदा वनक्षेत्रामध्ये सलई, खैर,बाभुळ या वृक्षांपासून निघणाऱ्या डिंक काढणारी टोळी सक्रिय असलेल्या बद्दल चर्चाआहे. वृक्षांची कत्तली चे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत.वडोदा वनक्षेत्रामध्ये पाणी आडवा पाणी जिरवा यासाठी शासनाने निधी मंजूर केला असून कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत.
वडोदा वनपरिक्षेत्र अधिकारी नसल्यामुळे अतिरिक्त पदभार मुक्ताईनगर चे वनक्षेत्रपाल,ए आर बच्छाव यांच्या कडे आहे, नाव मोठे लक्षण खोटे अशा प्रकारची त्यांची कारकीर्द आहे जंगलामध्ये फिरूनही पाहत नाही मात्र ज्या ठिकाणी बांधकाम व इतर कामे सुरू आहे त्या ठिकाणी व्हिजीट मारतात कारण लक्ष्मी प्रसन्न होते या उद्देशाने फक्त येतात असे बोलले जात आहे.या अशा कार्यप्रणाली मुळे वडोदा वनक्षेत्र नष्ट होण्याच्या मार्गावर असल्यामुळे या ठिकाणी शासनाने त्वरित वडोदा वन क्षेत्रपाल यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी वन्यप्रेमीव वृक्ष प्रेमी कडून होत आहे
......................................................................
महाराष्ट्रशासनाच्या वन विभागातील वरिष्ठांनी वडोदा वनक्षेत्रपाल याची नियुक्ती करताना अनुभवी ज्याची सेवा जास्त झालेली आहे.आणी कर्तव्याची जाणीव असलेल्या अशा अधिकार्यांची निवड करण्यात यावी जेणेकरून जंगलाचे संरक्षण होऊ शकेल.वन्य प्राण्यांची शिकार बंद होऊ शकेल प्राणी सुरक्षित राहतील अशा वनक्षेत्रपाल अधिकाऱ्याची यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिक परिसरातील मागणी करीत आहे.
.......................................................................

No comments:
Post a Comment