कलाली येथे तापी नदीत बुडून एकाचा मृत्यू ..
अमळनेर तालुक्यातील कलाली येथे गुरे चारण्यासाठी गेलेल्या एकाचा तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे . याबाबत अधिक माहिती अशी की , बारकू चंद्रा भील ( वय 43 ) हे गुरे चारण्यासाठी गेले असता तापी नदीत पडले . याची माहिती मिळाल्यावर गावातील 10 ते 15 जणांनी मिळून तापी नदीत उतरून पाण्यात शोध घेतला असता पाण्याच्या खोल कपारीत अडकून असल्याचे दिसून आले . त्यांना बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले . त्यावरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

No comments:
Post a Comment