प्रताप कनिष्ठ महाविद्यालय व स्थानिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (ज्यूक्टो) यांची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रताप महाविद्यालयाच्या सानेगुरुजी सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या सभेत २०२२-२०२५ ह्या कालखंडाची त्रैवार्षिक नूतन कार्यकारणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. त्यात खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष - प्रा. दिनेश बोरसे
उपाध्यक्ष - प्रा.सौ.एम्.एन्.भामरे ,
सचिव - प्रा.स्वप्नील पवार
खजिनदार - प्रा.सी.आर.पाटील
जेष्ठ सल्लागार - प्रा.दिनेश व्हि.भलकार
कार्यकारीणी सदस्य- प्रा.किरण पाटील, प्रा.प्रशांत ठाकूर, प्रा.विलास पाटील, प्रा.पंकज तायडे, प्रा.सौ.प्रतिमा लांडगे
जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रा.आर.एम्.पारधी , प्रा.जी.एल.धनगर यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रताप कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.यू.जी. मोरे यांनी काम पाहिले.
नूतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्याक्ष, उपकार्याध्याक्ष, सर्व संचालक मंडळ, सचिव, प्रताप कॉलेजचे प्राचार्य , उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नूतन सर्व कार्यकारीणीचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment