चोपड्याचे युवा चित्रकार अनिल पाटील याच्या चित्राची पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड ...
चोपडा येथील युवा चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील यांच्या चित्राची ऑनलाईन आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा निवड झाली....5 जून 2022 म्हणजेच अंतरराष्ट्रीय विश्व पर्यावरण दिवस प्रित्यर्थ दिल्ली येथिल प्रकृती कलाकार फाउंडेशन आयोजित चित्र स्पर्धा आयोजित केली होती.यात जगभरातुन नामवंत चित्रकारांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत यावेळी निसर्गाशी निगडित विषय दिला होता.
यात अनिलराज पूनमचंद पाटील यांनी एक सुंदर अश्या पक्ष्याचे चित्र जलरंग पारदर्शक माध्यमत तयार केले आहे. या 8 महिन्यात त्याची 7 वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. त्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.त्याला त्याचे शिक्षक श्री. राजेंद्र महाजन व पुण्याचे प्रख्यात चित्रकार चंद्र्शेखर कुमावत , संजय नेवे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

No comments:
Post a Comment