आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आर्थीक स्त्रोत म्हणून "मोह"ची मदिरा पाडण्याचे परवाने द्या.. आदिवासी समाज सेवक संजीव शिरसाठ यांची मागणी ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

27/04/2022

आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आर्थीक स्त्रोत म्हणून "मोह"ची मदिरा पाडण्याचे परवाने द्या.. आदिवासी समाज सेवक संजीव शिरसाठ यांची मागणी ...

चोपडा (प्रतिनिधी) :--
       आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आर्थीक स्त्रोत म्हणून "मोह"ची मदिरा पाडण्याचे परवाने द्या.. आदिवासी समाज सेवक संजीव शिरसाठ यांची मागणी ...
     शासनाने नुकताच किरकोळ दुकानदारांना बाजारात बिअर विकण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र दऱ्याखोऱ्यात, जंगल वाड्या पाड्यात राहणाऱ्या आदिवासींना  मात्र 'ना घरकाम ना घाटका' असे करून ठेवले आहे.योजना आहेत त्याही नावालाच.. त्यांच्या पर्यंत पोहोचतच नाही अशी अवस्था. जंगल व कष्ट पाचवीला पूजलेलं... मग दरिद्री जीवनातून बाहेर पळावं तरी कसे हा यक्ष प्रश्न सदासर्वदा त्यांच्या डोळ्यापुढे असतो. तरी शासनाने गांभीर्याने लक्ष घालून   सातपुडा पर्वत रांगेत जीवन व्यतीत करणाऱ्या आदिवासी बांधवांना 'मोहु 'च्या फुलांपासून दारु पाडण्याचे परवाने द्यावेत  अशी जोरदार मागणी आदिवासी समाज सेवक संजीव शिरसाठ यांनी केली आहे.शिवाय पीएम किसान योजनेत सरसकट आदिवासींच्या नावांचा समावेश करावा असे तहसीलदार चोपडा यांना देण्यात आले आहे.
     आज दिनांक २६/०४/२०२२ रोजी  मा. तहसिलदार अनिल गावित साहेब यांना संजीव शिरसाठ यांचे मार्गदर्शनाखाली निवेदन सादर करण्यात आले. त्यात सातपुड्याच्या रांगेतील आदिवासी वनदावेरांना पात्र अपात्र प्रलंबित यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळावा, व सामाविष्ट करावेत, तसेच पात्र अपात्र प्रलंबित वनदावेदारांना किसान क्रेडिट कार्ड मिळावे, आदिवासी बांधवांना पोट भरण्याच साधन म्हणून "मोहु" ची आर्येवेदिक नैसर्गिक दारु पाडण्यासाठी परवानगी मिळावी आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. 
      निवेदन देतेप्रसंगी संजीव शिरसाठ,बिराम बारेला,बियानु पावरा, गणदास बारेला,संजय बारेला,तुकाराम बारेला,नामसिंग पावरा,मालसिंग बारेला,ईडा बारेला,हासु पावरा,बालसिंग बारेला, दिनेश बारेला, सखाराम बारेला, मधुकर भिल, गुडा पावरा आदी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp