प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शिक्षक-पालकांच्या मदतीने जि.प.शाळेत पाणीयोजना राबविण्याची गरज
(भाग २)
सध्या शहरातील व खेड्यांवर जवळपास सर्वच शाळा सुरू झालेल्या असून, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागतही अभिनव पद्धतीने केले जात असल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र,तांदळवाडी येथे विद्यार्थ्यांचे शाळेत उत्साहात स्वागत होण्याऐवजी प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे विविध समस्यांनीच स्वागत झाले असे म्हणायला काही हरकत नाही . शाळेत लहान मुलांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, परिसर स्वच्छता या मूलभूत गरजांचा अभाव दिसून आला.शाळेच्या पटांगणावर व जुण्या खोल्यांसमोर उकीरडा साचलेला दिसून येतो.ज्या ठिकाणी विद्यार्थी खेडतात त्याठिकाणी अशी परीस्थिती असल्यास विद्यार्थी कसे घडवतील. जिल्हा परिषद शाळेकडे मुख्याध्यापिका, ग्रामपंचायत प्रशासन व शिक्षण समितीच्या दुर्लक्षामुळे असे होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
तांदळवाडी मध्ये पहिली ते सातवी पर्यंत प्राथमिक शाळा होती,नंतर कालांतराने खाजगी माध्यमिक शाळा सुरू करण्यात आली. प्राथमिक शाळेत आल्यावर मुलांचा उत्साह वाढण्याऐवजी नैराश्य व वातावरणामुळे ते निरुत्साही होत आहेत. तांदळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला विविध समस्यांनी ग्रासले आहे. शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि आवारातील स्वच्छता या बाबींकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. शाळेतील स्वच्छतागृहाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खिडक्या तुटलेल्या आहेत. येथे कधी स्वच्छता होते की नाही, हाच खरा प्रश्न आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे साथीचे विकार होण्याची भीती वाढली आहे.
जुन्या इमारतीचीही मोठी दुरवस्था झाली आहे. दरवाजे, पत्रे तुटलेले आहेत.बाकीचे पत्रे चोरीला गेलेत. त्यामुळे पाऊस आला, तर बसायला जागा शिल्लक राहील का, हा देखील प्रश्नच आहे. मुलांना खेळायच्या पटांगणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. नियमित साफसफाई होत नाही, असे चित्र डोळ्यासमोर पहावयास मिळते. त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन शाळांतीची त्वरित दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व पालकांनी केली आहे.
@ पाणी पिणेही अवघड @
पिण्याच्या पाण्याची हजार लिटरची टाकी उंच ओट्यावर असून, ओट्याचीही तटफूट झाली आहे. या टाकीला असलेला नळ फिरवणे देखील विद्यार्थ्यांना कठीण झाले आहे.टाकीत पूर्णपणे कचरा भरला गेला आहे.टाकीला झाकण नसल्यामुळे टाकीत पडून विद्यार्थ्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील तांदळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी घरी जाऊन पाणी आणण्याची वेळ आली आहे. मागील तीन महिन्यापासून नवीन शाळेचे बांधकाम सुरू होते त्यात बांधकाम करीत असतांना नळ कनेक्शन तुटल्याने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुलभा पाटील यांनी विद्यार्थ्यांना पीण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करायला पाहीजे होती मात्र तसे काही दिसून येत नाही. यामुळे पालक वर्गामध्ये नाराजीचा सुरू निघत आहे. तांदळवाडी येथील ग्रामसेवक श्री भैयासाहेब साळुंखे यांना विचारना केली असता बांधकाम सुरू असल्यामुळे पाण्याचा नळ कनेक्शन बंद होते परंतू ते लवकरच पूर्ववत करण्यात येईल अशी माहीती त्यांनी दिली.
तांदळवाडी जिल्हा परिषद शाळेत अधुन मधुन पाण्याची सोय होते ,परंतू ती जास्त काळ टिकत नाही त्यामुळे मुलांना आपली तहान भागविण्या साठी घरूनच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या दप्तरात आणाव्या लागतात, या बाटल्यांमुळे मुलांना अतिरिक्त बोजा पाठीवर सहन करावा लागतो. तर शिक्षक सुद्धा आपली तहान भागवण्यासाठी सोबत पाण्याची बाटली घरूनच भरून आणतात. या सर्व परीस्थितीकडे प्रशासनाने, गावातील राजकीय,सामाजिक कार्यकर्त्यांनी जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.
- - - (पुढील बातमीपत्रात वाचा जिल्हा परिषद जुण्या खोल्यांचा वापर) - - -

No comments:
Post a Comment