किराणा दुकानात दारू विक्रीबाबत नागरिकांनी आक्षेप नोंदवावा.. - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

07/04/2022

किराणा दुकानात दारू विक्रीबाबत नागरिकांनी आक्षेप नोंदवावा..

चोपडा(प्रतिनिधी) :--
     किराणा दुकानात दारू विक्रीबाबत नागरिकांनी आक्षेप नोंदवावा..
     जागतिक आरोग्य दिनानिमित्त जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन ...
    राज्य सरकारतर्फे किराणा दुकानात दारू (वाईन) विक्रीचा निर्णय घेण्यात आला असून जनतेला व्यसनमुक्त करण्याऐवजी व्यसनाधीन बनविणारा हा निर्णय आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.शासन एकीकडे व्यसनमुक्ती केंद्रांना अनुदान देते तर दुसरीकडे किराणा दुकानातून दारूविक्री बाबतचा निर्णय घेऊन एक प्रकारे राज्यातील जनतेला व्यसनाधिन करित आहे. याबाबत राज्यभरातून मिडिया तसेच सामाजिक संस्था संघटना व विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध व टीकाही केलेली आहे.तरिही याबाबत जनमत घेऊन निर्णय घेण्यात येईल यासाठी सरकार नागरिकांकडुन हरकती व सूचना मागवित आहे. दारूचे दुष्परिणाम लक्षात घेऊन सरकारने किराणा दुकानात दारू विक्रीचा निर्णय रद्द करावा व जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी. यासाठी सर्वसामान्य जनतेसह सुज्ञ व दक्ष नागरिक तसेच महिलामंडळांनी दि.२९ जूनपर्यंत 'आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क विभाग,महाराष्ट्र राज्य,दुसरा मजला,जुने जकात घर,शहीद भगतसिंग मार्ग,फोर्ट, मुंबई-४००००१ या पत्त्यावर टपालाद्वारे अथवा 'dycomm - inspection @ mah.gov.in' या 'ई मेल' पत्त्यावर हरकती, सूचना, विरोध व आक्षेप नोंदवावा,असे आवाहन जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.
=====================================
    @    सरकारने हा निर्णय त्वरित रद्द करावा..    @
      किराणा दुकान हे पारिवारिक दुकान म्हणून ओळखले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण या दुकानांमध्ये किराणा माल घेण्यासाठी जात असतो. अशा ठिकाणी दारूची विक्री झाली तर दारुड्यांना सहजच दारू मिळणार आहे.आज वाईन विक्री होईल उद्या छुप्या मार्गाने त्या ठिकाणी गावठी देशी दारूही विकली जाईल.जास्त नफा मिळतो म्हणून दुकानदारही जास्त दारूचीच विक्री करतील. यातून कुटुंबव्यवस्था मोडकळीस येईल.म्हणुनच सरकारने किराणा दुकानात वाईन (दारू) विक्रीचा निर्णय बदलला पाहिजे.. 
=====================================

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp