ज्याने केली वेगाची नशा ... त्याच्या जीवनाची झाली दुर्देशा... गोरगांवले रस्त्यावर वाहन चालवितांना सावधानता बाळगा.. माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन. - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

07/04/2022

ज्याने केली वेगाची नशा ... त्याच्या जीवनाची झाली दुर्देशा... गोरगांवले रस्त्यावर वाहन चालवितांना सावधानता बाळगा.. माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन.

चोपडा (प्रतिनिधी) :--
               ज्याने केली वेगाची नशा ...
          त्याच्या जीवनाची झाली दुर्देशा...
    गोरगांवले रस्त्यावर वाहन चालवितांना सावधानता बाळगा... माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन.
     चोपडा तालुक्यातील गोरगांवले बु.मार्गे जळगांव पर्यंतचा रस्ता सुप्पर झाल्याने ह्या मार्गावरील वाहतुक वाढत आहे. वाहनधारक चालक वेगवान पध्दतीने वाहन चालवित आहेत. रस्त्याला जागोजागी लहानमोठे वळण आहेत.पुढिल रस्ता लक्षात न आल्यामुळे वळणावर तसेच समोरासमोर वाहनांचे अपघात होत आहेत.
    याआधी बरेच अपघात होऊन त्यापैकी निम्मे लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. खासकरून गोरगांवले रस्त्यावरील हतनुर पाटबंधारे विभागाच्या लहान व मोठा कालव्यावरील पुलांची रूंदी नविन रस्त्यापेक्षा कमी असल्याने येथेच दिवसागणिक अपघात होतांना दिसत आहेत.ह्या पुलांची रूंदी वाढविण्यात यावी याबाबत पाठपुरावा सुरूच अाहे.परंतु अजुनही याकडे संबंधित विभागाचे अक्षम्यं दुर्लक्ष होत आहे. याआधीही ह्या अरूंद पुलांनी अनेकांचे बळी घेतलेले आहेत.यापुढे अशा घटना घडल्यास संबंधित विभागावरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी संतप्त भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
......................................................................
    @  घर कब आवोगे..परिवार आपली वाट बघत असतो..  @
       चोपडा व्हाया गोरगांवले भोकर कानळदा मार्गे जळगांव पर्यंतच्या जिल्हा व राज्यमार्गावर वापरतांना सर्वच लहानमोठे वाहनधारक चालक यांनी वेगावर नियंत्रण ठेवुनच वाहन चालवावे.कारण "घर कब आवोगे" म्हणुन परिवार आपली वाट बघत असतो.तसेच पादचारी शेतकरी शेतमजुर गुराखी बैलगाडीधारक यांच्याही व स्वतःच्याही जीवीताचे रक्षण करावे.म्हणुनच ह्या रस्त्यावरून वाहन चालवीतांना वाहन धारकांनी सावधानता बाळगावी..
......................................................................

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp