चैत्रोत्सवानिमित्त पाडळसरे येथे आठवडाभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन...
तीन दिवस गणेश याग, पंचमी पासून होणार देवी भागवत पारायण...
१९६१ पासून ग्रामदैवत अंबिका मातेचा चैत्रोत्सवाची अखंड परंपरा...
अमळनेर तालुक्यातील पाळसरे येथील सालाबादाप्रमाणे चालु असलेल्या चैञोत्सव कोरोनामुळे बंद होतो माञा या वर्षीय श्रीराम नवमी, हनुमान जंयतीचा योग साधून पाळसरे येथे चैञोत्सवाला सलग आठवडाभर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन अंबिका माता प्रतिष्ठान व ग्रामस्थांनी आयोजीत केले आहेत.
त्यात पुरोहित रविंद्र काळे व निमचे लक्ष्मण महाराज यांनी तीन दिवस गणेश यागाचे पुजन पठण होमहवन करुन पंचमी पासुन देवी भागवत चैञोत्सवाला प्रारंभ होऊन 9 एपिल पासुन अखंड हरिनाम किर्तन व श्रीमद भागवत संहिता पारायण कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन केले आहे. दिनांक 16 रोजी हनुमान जंयतीला कालाचे किर्तनाने महाप्रसाद वाटून सांगता होईल. तरी भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घावा असे मंदिर समिती व ग्रामस्थांनी केले आहे.

No comments:
Post a Comment