अमळनेर पाणीपुरवठा विस्वाळात जलकुंभावर जनतेला विचारण्याची सेवाही ठप्प ...
न.पा. करीत असलेला अमळनेर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालाय .याआधी न.पा.ने जलकुंभांवर मोबाईल फोन सेवा दिलेली होती. त्यातील बहुतांश मोबाईल संच गेल्या ४ महिन्यांपासून नादुरुस्त होवून बंद पडले असल्याने नागरिकांना जल कर्मचाऱ्यांला जाब विचारणे अशक्य झाले आहे . पाण्या अभावी रणरणत्या उन्हात अमळनेरची जनता पाणी पाणी करीत आहे . जमेची बाजू अशी की , अमळनेर शहरात अजून तरी वीज भारनियमन नाही .सोमवारचा सहावा दिवसही निघून गेला असला तरी अमळनेर शहराच्या अनेक भागांना नळाचे पाणी मिळू शकले नाही . न.पा. प्रशासन आणि मुख्याधिकारी यांनी पेयजलाच्या ज्वलंत समस्येकडे लक्ष द्यावे.अमळनेर शहरातील जलकुंभां वरील कर्मचारी नागरिकांना धड उत्तरेसुद्धा देत नाहीत ; टाळाटाळ करीत असतात असे कटू अनुभव नागरिकांना येत आहेत . तालुक्यातील तापी नदीच्या कलाली आणि तसेच जळोदचा डोह अशा २ ठिकाणाहून अमळनेर शहराला पाणी पुरवठा होतो. तेथील भ्रमणध्वनी संच गेले ४ महिन्यांपासून नादुरुस्त होवून पडले आहेत . न.पा.ने ते दुरुस्त कर द्यावेत किंवा संबंधित कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर जाहीर करावेत ; जेणेकरुन नागरिकांना त्यांच्याशी मोबाईलद्वारा थेट संपर्क साधता येऊ शकेल व पाण्याची सद्यस्थिती कळू शकेल अशी मागणी अमळनेर शहरवासी नागरिकांकडून केली जात आहे .

No comments:
Post a Comment