प्रताप महाविद्यालयात प्रॅक्टिकल सुरू असताना विद्यार्थ्याचा मृत्यू .. - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

27/04/2022

प्रताप महाविद्यालयात प्रॅक्टिकल सुरू असताना विद्यार्थ्याचा मृत्यू ..

अमळनेर (प्रतिनीधी) :-- पंकज पाटील
      प्रताप महाविद्यालयात प्रॅक्टिकल सुरू असताना विद्यार्थ्याचा मृत्यू ..
     प्रताप महाविद्यालयात पदव्युत्तर - एमएससीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा आज प्रॅक्टिकल सुरू असतानाच दुर्दैवी मृत्यू झाला . निलेश झांबरलाल पाटील असे या विद्यार्थ्याचे नाव होते . निलेश चक्कर येऊन खाली पडताच मित्रांनी आरडाओरड केली असता तात्काळ विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी धावत आले . व निलेशला सर्वांनी अमळनेर येथील डॉ . बहुगुणे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी आणले.
     मात्र तेथे डॉ .बहुगुणे यांनी तपासणी केली असता तो मृत झाला होता . तेथे डॉ . बहुगुणे यांनी निलेशला मृत घोषित केले . त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात बॉडी शवनिच्छेदनासाठी पाठवण्यात आले असता डॉ .आशिष पाटील यांनी शवनिच्छेदन केले .निलेशचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती शवनिच्छेदनातुन समोर आली आहे .निलेश सकाळ पासून चिंतेत असल्याचे त्याच्या मित्रांनी संगीतले . मनमिळाऊ व अभ्यासू मित्र गमावल्याने निलेशच्या मित्रांनी दुःख व्यक्त केले . निलेश पाटील हा पिंपळे रोड , अमळनेर येथे परिवारासोबत राहत होता . निलेशचे वडील भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त कर्मचारी असून ते सध्या महावितरण कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत . त्याच्या जाण्याने परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp