कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना 7 व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम तात्काळ मिळावी -- जुक्टो संघटनेची एकमुखी मागणी. - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

26/05/2023

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना 7 व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम तात्काळ मिळावी -- जुक्टो संघटनेची एकमुखी मागणी.

जळगाव (प्रतिनिधी) : - -
          कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना 7 व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम तात्काळ  मिळावी -- जुक्टो संघटनेची एकमुखी मागणी.
            राज्यशासनाने नुकताच दि. 24 मे 2023 रोजी 7 व्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता माहे जून 2023 च्या वेतनात रोखीने देण्यासंदर्भात मा.वित्त विभागाद्वारा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. मात्र असे असताना राज्यातील जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुलै 2021 मध्ये देय असलेल्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम अद्यापही प्रदान करण्यात आलेली नाही. कोरोना काळात कमजोर अर्थव्यवस्थेचे कारण देत दुसरा आणि तिसरा हप्ता प्रलंबित ठेवण्यात आला होता.
          कालांतराने राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर जुलै 2020 मध्ये द्यावयाच्या दुसऱ्या हप्ताची रक्कम तब्बल 2 वर्षे उलटून गेल्यावर  नुकतीच प्रदान करण्यात आलेली आहे. मात्र त्याचवेळी जुलै 2021 च्या तिसरा हप्त्याची रक्कम देणे अभिप्रेत असताना आर्थिक तरतूद नसल्याचे कारण पुढे करून वित्त विभागाने शिक्षक संवर्गाला सदर हप्ता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे. त्यातच शालार्थ वेतन प्रणालीमधून थकीत वेतन, DA थकबाकी, तसेच अन्य थकबाकी संदर्भातली टॅब बंद करण्यात आलेली असून केवळ नियमित वेतनच अदा करण्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे. अशा परिस्थितीत नुकताच चौथा हप्ता जून 2023 च्या वेतनात रोखीने देण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे.
           मात्र नेहमीप्रमाणे शासनाच्या शिक्षकांना प्रतिच्या आडमुठ्या, अन्यायकारक, नकारात्मक धोरणामुळे अद्यापही तिसऱ्या हप्त्याची रक्कम अदा करण्यात आलेले नाही. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाद्वारा वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला असून वित्त विभागाकडून अत्यावश्यक निधी मिळत नसल्याकारणाने तिसरा हप्ता अदा न करण्यात आल्याचे कारण शिक्षण विभागाला दिले जाते.
            एकंदरीत बघता वित्त विभाग आणि शिक्षण विभाग यांच्यात कुठल्याही प्रकारचा समन्वय नसल्याने व त्यातल्या त्यात D. C. P. S. / N. P. S.  धारकांना सदर हप्त्यांवर व्याज देण्याची तरतूद नसल्या कारणामुळे D. C. P. S. / N. P. S. धारकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तिसऱ्या व चौथ्या हप्त्याची रक्कम एक महिन्याच्या अंतराने त्वरित रोखीने अदा करण्यात यावी अन्यथा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रा. नंदन वळींकार (अध्यक्ष), प्रा. सुनील सोनार (सचिव) प्रा. डॉ. अतुल इंगळे (उपाध्यक्ष) प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.डी. पाटील (जेष्ठ मार्गदर्शक), प्रा. सुनील पाटील, प्रा.शैलेश राणे (कार्याध्यक्ष) यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp