अमळनेर तालुक्यातील मुजोर शासकीय अधिकारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही ऐकत नाही : - आ अनिल पाटील - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

06/06/2023

अमळनेर तालुक्यातील मुजोर शासकीय अधिकारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही ऐकत नाही : - आ अनिल पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) : - -
          अमळनेर तालुक्यातील मुजोर शासकीय अधिकारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही ऐकत नाही : - आ अनिल पाटील
           अमळनेर येथील प्रशासकीय व महसूल इमारतीस प्रशासकीय मान्यता आणि निधी मंजूर झाला असून नियोजित जागा ही महसूल विभागासाठी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकामंत्री गुलाबराव पाटलांनी सूचना व आदेश देऊनही इमारतीचे काम सुरू होत नाही याचा अर्थ पालकमंत्र्यांचे अथवा सरकारचे प्रशासन ऐकत नाही असा होतो. मी अनेकवेळा पालकमंत्र्यांकडे गेलो त्यांनी अधिकाऱ्यांना फोन लावले असता काही अधिकारी फोन घेत नाही अथवा कामे ऐकत नाहीत.
          सर्वसामान्य जनतेला बसस्थानक पासून जवळ व एकाच ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये एकत्र असतील अशी सुविधा होणार आहे. मात्र हे काहींना पचत नसून यामागे राजकारण घुसले आहे. नागरिकांची गैर सोय करणारा झारीतील शुक्राचार्य कोण ? असा सवालही आ. अनिल पाटील यांनी केला आहे. इमारत त्याच ठिकाणी व्हावी अशी आमची मागणी कायम राहील त्यासाठीच 12 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असून त्यानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जातील असाही इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp