राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो खा. शरद पवारांच्या अमळनेर दौऱ्याची तयारी ; राष्ट्रवादी काँग्रेस ची आढावा बैठक उत्सहात संपन्न ..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

06/06/2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो खा. शरद पवारांच्या अमळनेर दौऱ्याची तयारी ; राष्ट्रवादी काँग्रेस ची आढावा बैठक उत्सहात संपन्न .....

अमळनेर (प्रतिनिधी) : - -
         राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो खा. शरद पवारांच्या अमळनेर दौऱ्याची तयारी • • •
           राष्ट्रवादी काँग्रेस ची आढावा बैठक उत्सहात संपन्न 
         अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या सह माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते अजित पवार, पक्षाचे प्रांताध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या 16 जुन रोजी होणाऱ्या अमळनेर दौरा नियोजन संदर्भात आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ची बैठक उत्साहात पार पडली.
         यावेळी नवनियुक्त बाजार समिती सभापती तसेच संचालक यांचा सत्कार व 12 जून रोजी प्रशासकीय इमारतीसाठी करण्यात येणाऱ्या उपोषण आंदोलनावर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली.
          खासदार शरद पवार अनेक वर्षानंतर अमळनेरात येत असल्याने त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनाची सविस्तर माहिती यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, सर्व सेलचे अध्यक्ष व सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शेतकी संघ प्रशासकीय सदस्य मंडळ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी  सोसायटी चेअरमन, व्हॉईस चेअरमन, संचालक मंडळ आदी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp