जागतिक पर्यावरण दिनी भीषण वास्तव... अवैध वृक्षतोड जोमात - प्रशासन कोमात... कुंपणच शेत खातय ~ तिथ आम्ही काय करणार ; खा. रक्षाताईनी केली कान उघडणी ! - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

05/06/2023

जागतिक पर्यावरण दिनी भीषण वास्तव... अवैध वृक्षतोड जोमात - प्रशासन कोमात... कुंपणच शेत खातय ~ तिथ आम्ही काय करणार ; खा. रक्षाताईनी केली कान उघडणी !

चोपडा (प्रतिनिधी) : - -
            जागतिक पर्यावरण दिनी भीषण वास्तव...
         अवैध वृक्षतोड जोमात - प्रशासन कोमात... कुंपणच शेत खातय ~ तिथ आम्ही काय करणार 
         खा. रक्षाताईनी केली कान उघडणी ! ! !
         चोपडा तालुक्यात गेल्या अनेक दिवसा पासुन अवैध वृक्षतोड सुरु असून बिनादिक्कत पणे वाहतूकही होते. महसूल व वनविभागाच्या आशीर्वादाने डेरेदार वृक्षांची बेसुमार कत्तल सुरु आहे. याला महसूल व वनविभागातील अधिकाऱ्यांची भ्रष्टाचारी प्रवृत्ती कारणीभूत आहे. यांच्या आशीर्वादाने अवैध वृक्षतोड करून विटभट्टी चालकांना लाकूड पुरविण्याचा अवैध धंदा राजरोस पणे बिनबोभाट सुरु आहे. 
         तसेच चोपडा - शिरपूर रस्त्यावरील डेरेदार वृक्षाच्या बुंध्याना आग लावून वृक्षांची कत्तल सुरु आहे. तसेच शेतातील व शेताच्या बांधा वरील , रोडाच्या कडेला असलेल्या वृक्षाचीही या भ्रष्टाचारणे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बेसुमार कत्तल सुरु आहे. याला लाकूड माफिया व अधिकारी यांच्यातील अर्थपूर्ण संबंध कारणीभूत आहेत. अशी चर्चा सुरु आहे.
            बिनालाईट व बिनानंबर प्लेटच्या ट्रॅक्टरने अवैध वृक्षतोड केलेल्या लाकडाची चोरटी वाहतूक करत असताना झालेल्या अपघातात निष्पाप युवकाचा बळी गेला त्याचे कोणाला सोय-सुतक नाही अद्यापही यावर कोणतीही कारवाई का झाली नाही याला काय कारण ? कोणी काय सुविधा पुरविली , कोणी काय गिप्ट दिले , कोणी जेवणाचा कशाचा डबा दिला , कोणी पाकीट दिले अशी चर्चा सुरु आहे.
        अवैध वृक्षतोड करून त्या लाकडाची राजरोस पणे ताडपत्री किंवा काळे प्लस्टिक झाकून शहरातून वाहतूक होत असते. याला कोणाचा आशीर्वाद आहे. अशीच वृक्षतोड सुरु राहिल्यास या वर्षी चोपडा तालुक्यात 46 ते 47 डिग्री तापमान होते. ते पुढील वर्षात 50 डिग्री झाल्याचे पाहायला मिळेल असे वाटते.
        @  खा. रक्षाताई खडसे यांनी सहायक वनसंवरक्षक यांची केली कानउघडणी  @
        तालुक्यात होत असलेली अवैध वृक्षतोड व शहरातून होत असलेली लाकडाची राजरोस वाहतूक यावर नागरिकांची मागणी व पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत खा. रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी यांना फोन करून तक्रार केली व त्या नंतर सहायक वनसंवरक्षक यांना फोन करून अवैध वृक्षतोड का होत आहे ? याला आळा का घातला जात नाही ? या कडे दुर्लक्ष का केले जात आहे ? अवैध वृक्षतोडीला तुमचा पाठींबा आहे का ? अवैध वृक्षतोड बंद न झाल्यास मला आंदोलन करावे लागेल अश्या शब्दात सहायक वनसंवरक्षक पी. व्ही. हळपे यांची कानउघडणी केली.
         अवैध वृक्षतोड न थांबल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होऊन कडक उन्हाळा व भीषण जल समस्या उभी राहील. जैववीधतेतील असंतुलन अश्या समस्याना सामोरे जाव लागेल. लक्षात ठेवा पृथ्वी हा सजीव सृष्टी साठी असलेला एकमेव ग्रह आहे.
  #  आताच सावरा - पृथ्वी जपून वापरा ! !   #

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp