दहिवद गावाचे सुपुत्र प्रकाश शेलकर प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त . . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

10/07/2023

दहिवद गावाचे सुपुत्र प्रकाश शेलकर प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त . . . .

अमळनेर (प्रतिनिधी) : - -
           दहिवद गावाचे सुपुत्र प्रकाश शेलकर प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त . . . .
          आपल्या शांत, संयमी स्वभावासाठी ओळखले जातात...
           शिक्षक म्हणजे आपल्या कार्यरूपाने समाजामध्ये सदैव अधोरेखित होणार व्यक्तिमत्व. प्रत्येक व्यक्ती आपल्या विविध गुणांच्या माध्यमातून जनसामान्यांवर आपली एक वेगळी छाप सोडून जात असतात आणि त्यांच्यातील या नाविन्यपूर्ण स्वभावामुळे, व्यक्तिरेखेमुळे, कौशल्यामुळे त्यांचं एक अढळ स्थान निर्माण होत असतं. आपल्या ध्येय शक्तीने, कल्पकतेने, अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम शिक्षकांच्या माध्यमातून होत असतं. असंच एक साध सरळ व्यक्तिमत्व ज्यांनी वयाची 28 वर्ष या शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतली ते म्हणजे आपल्या अमळनेर तालुक्यातील दहिवद गावाचे सुपुत्र प्रकाश माणिक शेलकर. त्यांच्या या प्रदीर्घ सेवेनंतर 30 जून 2023 रोजी ते सेवानिवृत्त झाले आहेत. 
         दहिवद येथील अध्यात्मिक व्यक्तिमत्व कै. माणिक लहू शेलकर यांचे द्वितीय सुपुत्र, तसेच दहिवद गावाचे कार्यकुशल माजी सरपंच कै. लक्ष्मण माणिक शेलकर यांचे लहान बंधू. कला शिक्षक आणि आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशनचे संस्थापक विनोद शेलकर, कल्याण यांचे काका, श्री.संत सावता माळी युवक संघाचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन यांचे सासरे. 
             घरातूनच मेहनती, हरहुन्नरी, अध्यात्मिक आणि सामाजिक वारसा लाभलेले प्रकाश माणिक शेलकर हे एक सहृदयी व्यक्तिमत्व. गावातील, नातेवाईकांमध्ये कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहून आपल्या स्नेहबंधाची नाळ त्यांनी गावापासून दूर राहून सुद्धा कधी तुटू दिली नाही. खरंतर अथक परिश्रमानंतर लग्नानंतर लक्ष्मीच्या पावलांनी पदार्पण केल्यानंतर त्यांना नोकरीची संधी मिळाली. आणि त्यांनी त्या संधीचे सोनं ही केलं. त्यांनी  23 / 6 / 1995 ला आपल्या सेवाकाळाला पळशी खुर्द कन्नड तालुका येथून सुरवात केली. आपल्या अध्यापनातून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. जिल्हा परिषद शाळा म्हटली म्हणजे सातत्याने बदलीचा ससेमेरा मागे असतोच. 2003 पर्यंत तेथे काम केल्यानंतर वाडी पळशी (रामनगर ता.कन्नड)  येथे त्यांची बदली झाली. येथे त्यांनी 2012 पर्यंत आपली सेवा दिली. मग पुढे त्यांची बदली वांगी बु. ता. सिल्लोड येथे झाली. 2018 पर्यंत त्यांनी येथे सेवा देत. पुन्हा त्यांची बदली वडोद चाथा ता. सिल्लोड इथे झाली आणि शेवटी 30 जून 2023 रोजी ते त्यांचा हा प्रदीर्घ सेवाकाळ संपवून सेवा निवृत्त झालेले आहेत..
          त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, दहिवद येथे झाले त्यानंतर पाचवीपासून दहावी पर्यंतचे त्यांचे शिक्षण नवभारत माध्यमिक विद्यालय, दहिवद या शाळां मध्ये  झाले. त्यानंतर त्यांनी नागपूर  येथून डी. एड. करून आपले शिक्षण पूर्ण केले. गावात असतांना आपल्या कॉलेज जीवनात त्यांनी विविध नाटकांमध्ये, सांस्कृतिक सहभाग घेतला, तसेच गावातील सांस्कृतिक परंपरेतील रामलीलेत ही त्यांनी अनेक पात्र साकारली आहेत. ते उत्तम वादक ही आहेत. पत्नी उषा या गृहिणी असून मोठे जावई मुकेश महाजन शिरपूर , लहान जावई जितेंद्र महाजन लासूर येथील आहेत, मुलगा कृष्णा आता आर.सी.पटेल कॉलेज ऑफ फार्मसी येथे सहा. प्राध्यापक म्हणून काम पाहत आहे. लहान मुलगी दिपाली ही एम. एस्सी. करत आहे. बहीण कमलबाई किंनगाव येथे गंगाराम विठ्ठल महाजन यांच्याकडे आपल्या संसाराचा गाडा अतिशय नेटाने सांभाळत आहेत. असा हा त्यांचा अतिशय आनंदी परिवार. प्रकाश शेलकर सर यांना पुढील निरामय, निरोगी, आनंदी आयुष्याच्या मंगलमय शुभेच्छा.. आता त्यांना अजून आपल्यातील कला गुणांना, तसेच परिवाराला वेळ देण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp