लोकसंख्येची संख्यात्मक वाढ पेक्षा गुणात्मक वाढ व्हावी - प्रा. डॉ. शैलेश वाघ - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

11/07/2023

लोकसंख्येची संख्यात्मक वाढ पेक्षा गुणात्मक वाढ व्हावी - प्रा. डॉ. शैलेश वाघ

चोपडा (प्रतिनिधी) : - -
          लोकसंख्येची संख्यात्मक वाढ पेक्षा गुणात्मक वाढ व्हावी - प्रा. डॉ. शैलेश वाघ
           महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील महाविद्यालयात आज दिनांक 11 / 07 / 2023  मंगळवार रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्यात आला .
           या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे यांनी भूषविले सोबत , महाविद्यालयाचे समन्वयक व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.डॉ शैलेशकुमार वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री एस पी पाटील ,पर्यवेक्षक श्री ए.एन.बोरसे, समन्वयक श्री.पी.एस.पाडवी, आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
          या कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता 11वी व 12वी च्या विद्यार्थ्यांना प्रमुख वक्ते प्रा.डॉ शैलेशकुमार वाघ, यांनी कार्यक्रम साजरा करण्याची उद्दिष्टे स्पष्ट केली व लोकसंख्या ही संख्यात्मक वाढपेक्षा लोकसंख्येची गुणात्मक वाढ व्हावी या दृष्टीने प्रयत्न करावे असे उपस्थितांना आवाहन केले.
         कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी प्रगती दिपक चव्हाण, आरती कैलास बारेला, रोशनी मिलिंद शिरसाठ, पंचशीला विरभान चव्हाण, वर्षा योगेश कोळी, साक्षी सुनील कोळी, प्रेम जितेंद्र कोळी, धनश्री ईश्वर कोळी यांनी लोकसंख्या वाढीचे सकारात्मक व नकारात्मक बाबी मांडल्या व अध्यक्षीय भाषणात प्रा डॉ के एन सोनवणे यांनी लोकसंख्येबाबत सर्वांनी काटेकोर पालन करून देश समृद्ध कसा करता येईल याबाबत मत व्यक्त केले.
          कार्यक्रमाची सुरुवात ही संगीत विभागाचे शिक्षक व विद्यार्थी यांनी गीत गायनाने केली. या कार्यक्रमात श्री एस टी शिंदे, श्री दिलीप सपकाळे, श्री संदीप पाटील, श्री प्रमोद पाटील, श्री.दीपक करणकाळ, श्री विशाल पाटील उपस्थित होते.
          तसेच यशस्वीतेसाठी श्री मुकेश पाटील , श्री मोतीराम पावरा, श्री निवृत्ती पाटील, श्री विवेकानंद शिंदे, श्री संदीप पाटील व शिक्षकेतर कर्मचारी श्री राकेश काविरे यांचे अनमोल योगदान लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पी एस पाडवी , सूत्रसंचालन सौ अनिता सांगोरे यांनी तर आभार श्री अभिजित पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp