एक प्रयोग असाही......... ! ! ! गणपूरच्या प्राथमिक शाळेकडून बीजगोळ्यांची पेरणी - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

11/07/2023

एक प्रयोग असाही......... ! ! ! गणपूरच्या प्राथमिक शाळेकडून बीजगोळ्यांची पेरणी

चोपडा (गणपूर प्रतिनिधी) : - -
          एक प्रयोग असाही......... !  !  !
        गणपूरच्या प्राथमिक शाळेकडून बीजगोळ्यांची पेरणी 
          गणपूर ता. चोपडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवून तयार केलेल्या सिडबॉल ची पेरणी नुकतीच गावाजवळील दरी कपारीत विद्यार्थ्यांनी केली.
           नव्याने निर्माण करण्याची शक्ती निर्सगात आहेच, आपण फक्त निमित्त मात्र ठरतो. वर्षभर आपण विविध प्रकारची फळे आहारात घेत असतो, त्या फळांच्या बिया फेकून न देता विद्यार्थ्यांनी संग्रहित केल्या. व त्यापासून सिडबॉल बनविले. सिडबॉल म्हणजे बीज गोळे बियांना हलक्या अशा मातीच्या गोळ्यामध्ये साठवून ते गोळे सुकवून ठेवले गेले. आणि आता पाऊस पडताच त्या जमिनीत टाकल्या गेल्या. गोळ्यातील बीज अंकुरते व तिथे झाड आपोआप उगवते.असा हा प्रयोग आहे.
           विद्यार्थ्यांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देऊन आपल्या स्तरावर शेकडो सिडबॉल बनविले. यात आंबा, जांभूळ, चिंच, या फळबिया तसेच लिंब, या सारखी सावली देणारे अनेक झाडांच्या बिया वापरून बीजगोळे बनविण्यात आले होते.ते आज जमिनीत टाकण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp