लासूर येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण . . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

18/07/2023

लासूर येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण . . . .

चोपडा (प्रतिनिधी) : - -
           लासूर येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण . . . .
          लासूर येथे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली. सकाळी 9:00 वाजता माळी समाज मंगल कार्यालय येथे गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी व समाज बांधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच पुण्यतिथी निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व भक्तिमय वातावरणात संत शिरोमणी सावता महाराज यांची आरती करून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणुकीत गावातील समाज बांधव व महिला मंडळाची उपस्थिती लक्षनीय होती.
           तसेच श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी निमित्त क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ व श्री संत सावता महाराज ग्रामीण बिगरशेती पतसंस्था लासूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्मशानभूमी परिसर व माळी समाज मंगल कार्यालयाच्या नवीन जागेत वृक्षारोपण करण्यात आले.
          त्याप्रसंगी क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष ए के गंभीर सर, उपाध्यक्ष रामकृष्ण माळी, सचिव  सुरेश पवार, सहसचिव अरुण माळी, श्री संत सावता महाराज ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे चेअरमन आर एन पवार सर, व्हा. चेअरमन जितेंद्र महाजन, वि का सह सो चेअरमन सुरेश माळी, पीक संरक्षण सो सा चेअरमन गोकुळ माळी, पतसंस्थेचे माजी चेअरमन गोविंद माळी, संचालक शंकर माळी, हिंमत माळी सर, कैलास महाजन सर, प्रवीण मगरे, जेष्ठ समाज बांधव हिंमतराव महाजन, रतिलाल माळी, तुकाराम माळी, क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र महाजन, भास्कर माळी, रमेश माळी, साखरलाल माळी, देविदास मगरे, जिभाऊ टेलर्स, जगन्नाथ महाजन आदी उपस्थित होते.
          सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे संचालक मास्टर टेलर्स, प्रमोद मगरे,पीक संरक्षण सो सा माजी व्हा चेअरमन किशोर माळी सर, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश महाजन, वासुदेव महाजन, दिपक महाजन, शामकांत माळी, प्रेमराज शेलकर, विनोद महाजन सर, नितीन माळी, निलेश राजकुळे, राजेश माळी, पप्पू माळी आदी समाज बांधव यांनी परिश्रम घेतले 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp