अमळनेर ला होणारे साहित्य संमेलन म.वा.मंडळ नव्हे तर खानदेशचे ; चोपडा सहविचार सभेत डॉ. अविनाश जोशी यांचे प्रतिपादन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

20/07/2023

अमळनेर ला होणारे साहित्य संमेलन म.वा.मंडळ नव्हे तर खानदेशचे ; चोपडा सहविचार सभेत डॉ. अविनाश जोशी यांचे प्रतिपादन

चोपडा (प्रतिनिधी) : - -
         अमळनेर ला होणारे  साहित्य संमेलन म.वा.मंडळ नव्हे तर खानदेशचे ; चोपडा सहविचार सभेत डॉ. अविनाश जोशी यांचे प्रतिपादन 
         अमळनेर येथे दि. 2 ,3 व 4 फेब्रु. ला होणाऱ्या 97 व्या अ. भा . मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी चोपडा येथे नगर वाचन मंदिरात  नुकतीच   सहविचार सभा संपन्न झाली .ह्यावेळी संमेलन आयोजक संस्था पदाधिकारी  नरेंद्र निकुंब यांनी संमेलन आयोजनाचा हेतू कथन केल्या नंतर  अध्यक्ष  डॉ .श्री .अविनाश जोशी यांनी संत सखाराम महाराज, दुर्मिळ मंगळग्रह मंदिर,पू .सानेगुरुजी, दानशूर श्रीमंत कै .प्रताप शेठजी, उद्योजक अझिमभाई  प्रेमजी सारख्यांच्या व विविध धार्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक, औद्योगिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अमळनेरच्या समृद्ध भूमीत 1952 नंतर आता दुऱ्यांदा अ .भा . मराठी साहित्य संमेलन आयोजनाची संधी मराठी वाङ्मय मंडळ ,अमळनेरला मिळाली असल्याचे सांगितले . मात्र हे संमेलन आम्ही फक्त एकट्या म .वा . मंडळाचे मानत नसून ते खानदेशाला मिळालेले संमेलन असल्याचे त्यांनी आग्रहाने स्पष्ट केले . यावेळी डॉ जोशी यांनी साहित्य महामंडळाच्या निर्देशानुसार असलेल्या कार्यक्रमांव्यतिरिक्त संमेलनाच्या पूर्वसंध्येला बाल साहित्य संमेलन, तर संमेलनात खानदेश बाणा, अहिराणी दालन, खानदेशी साहित्यिकांना 30 % प्रतिनिधीत्वाची अपेक्षा, मराठीला अभिजात दर्जा का मिळत नाही यासाठी अभिरूप न्यायालय - यासम काही कार्यक्रम व भोजनातही खास खानदेशी मेनू , निवास व्यवस्था, निधी उभारणे साठीच्या संकल्पना, वेगळ्या स्मरणिकेचा मानस यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. सोबत उपस्थितांनी मांडलेल्या सूचना, व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया, अपेक्षा नोंदवून घेत संमेलन संस्मरणीय होण्यासाठी खानदेशात आणखी वेगवेगळ्या तालुक्यांच्या ठिकाणी, शाळा, महाविद्यालये येथे अनेक सहविचार सभा, बैठकांचे आयोजन करण्यात येत असून संमेलन संदर्भात वातावरण निर्मिती व शासन निधी व्यतिरिक्त चा आणखी निधी संकलना साठीचे प्रयत्न सप्टेंबर अखेर संपविण्याचे नियोजन असल्याची माहिती दिली .
           यावेळी कवी रमेश पाटील , माजी ग. स. संचालक देवेंद्र पाटील , प्रा .डॉ. अनंत देशमुख, योगेश चौधरी, संजीव शेटे, शैलेंद्र महाले यांनी काही सूचना , अपेक्षा व प्रतिक्रीया व्यक्त केल्या . त्यावर सूचना, अपेक्षांची नोंद घेत संमेलन यशस्वीते साठी उपस्थितांना तन - मन - धनाने सहकार्य करण्याचे आवाहन डॉ . अविनाश जोशी यांनी केले .
          सहविचार सभेच्या अध्यक्ष स्थानावरून  मनोगत व्यक्त करतांना कवी अशोक नी . सोनवणे यांनी गत संमेलनातील लक्षात आलेल्या त्रुटींचा संदर्भ देत या 97 व्या संमेलनात त्या टाळल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करीत मार्गदर्शन केले . यावेळी व्यासपीठावर म . वा . मंडळाचे नरेंद्र निकुंब,सोमनाथ ब्रम्हे, विधिज्ञ भैय्यासाहेब मगर, चोपड्याचे प्रभाकर महाजन, एस. बी. पाटील यांची उपस्थिती होती . या सहविचार सभा आयोजनाचे आयोजक नगरवाचन मंदिर चोपडा, म .सा . प . चोपडा, मायमराठी अध्यापक संघ , चोपडा व अखिल भारतीय साहित्य परिषद व पत्रकार मित्र यांचे सदस्य, प्रतिनिधी यांनी उपस्थिती देत आपली माय मराठी ची बांधिलकी जोपासली . सहविचार
          सभेचे प्रास्ताविक म .सा .प . कार्याध्यक्ष विलास पाटील खेडीभोकरीकर, सूत्रसंचालन कार्यवाह संजय बारी व आभार अ .भा . साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेंद्र भावे यांनी केले. सहविचार सभेस प्रा . संदीप पाटील, कवयित्री योगीता पाटील, संगीता बोरसे, शां .हि . पाटील, टी . एम . चौधरी, पवन लाठी यांसह 40 च्या वर रसिकांची उपस्थिती होती .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp