जागतिक सर्पदिनानिमित्त माचले येथे शून्य सर्पदंश जनजागृती अभियान ..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

20/07/2023

जागतिक सर्पदिनानिमित्त माचले येथे शून्य सर्पदंश जनजागृती अभियान .....

चोपडा (प्रतिनिधी) : - -
           जागतिक सर्पदिनानिमित्त माचले येथे शून्य सर्पदंश जनजागृती अभियान
           चोपडा तालुक्यातील माचले येथील आईसाहेब चिंधाबाई निंबाजी पाटील माध्यमिक विद्यालय , येथे 16 जुलै जागतिक सर्प दिनानिमित्त शून्य सर्पदंश जनजागृती अभियान अंतर्गत सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे सापांबद्दलची भीती व गैरसमज दूर करून सर्प संवर्धनाचे आवाहन पक्षी व वन्यजीव अभ्यासक व संवर्धक श्री हेमराज पाटील यांच्यातर्फे करण्यात आले.
          विद्यालयातील माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी , सर्व शिक्षक बंधू - भगिनी व कर्मचारी यांना जागतिक  सर्प दिनानिमित्त सापांचे अन्नसाखळीतील महत्त्व , पर्यावरणीय परिस्थितीतील सापांचे स्थान , सर्प हे शेतकऱ्यांचे व मानवाचे मित्र कसे , परिसरात आढळणारे विषारी व बिनविषारी सर्प कोणते यांची सचित्र ओळख , सर्पदंश होऊ नये म्हणून घ्यावयाची खबरदारी , सर्पदंश झालाच तर प्रथमोपचार कसे करावे इत्यादी बाबतीत अभ्यासपूर्ण माहिती देऊन सर्व उपस्थितांचे प्रबोधन केले. साप निघाल्यास त्यास ठार न करता सर्पमित्रांची मदत घेऊन सापांचे रक्षण करण्याचा विद्यालयातर्फे निर्धार करण्यात आला.
         सर्वत्र आता मान्सूनने जोर धरला आहे. त्यामुळे या कालावधीत शेत-शिवारात , खळ्यात , चारा भरण्याच्या व गुरांच्या गोठ्यात , घराच्या आजूबाजूला , अडगळीच्या ठिकाणी साप आढळून येण्याची शक्यता जास्त असते. याच कालावधीमध्ये सर्प प्रजातींचा प्रजनन कालावधी देखील असतो. पावसाचे पाणी बिळात , तडे , जमिनीत पोकळ भागात साचल्याने सर्प बाहेर पडतात व इतरत्र नवीन आसरा शोधतात. अशा वेळी नागरिकांनी , शेतमजूर बांधवांनी घाबरून न जाता सर्पमित्रांना मदतीसाठी बोलवण्याचे आवाहन करण्यात आले.
          साप आढळून आल्यास त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका , काठी अथवा दगड मारू नका , लहान मुले , वृद्धव्यक्ती , पाळीव प्राण्यांना त्यापासून दूर ठेवा , जोखीम पत्करून साप पकडण्याचा प्रयत्न करू नका , सुरक्षित दूर अंतरावर उभे राहून सापावर लक्ष ठेवून राहा व तात्काळ जवळच्या सर्प मित्राला संपर्क करून सापाला निसर्गात सोडून मुक्तपणे जगण्यास सहकार्य करा.
           यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक व योग शिक्षक श्री प्रविण पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून सर्प संरक्षण व निसर्ग सेवेचे महत्त्व विशद केले , तसेच उपस्थितां कडून पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा म्हणवून घेतली, कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवी व थोर साहित्यिक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार श्री वसंत पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विद्यालतील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp