चोपडा जैन समाजातर्फे जैन मुनीश्री हत्येचा प्रशासनाला निवेदन ; अल्पसंख्याक शांतता व अहिंसावादी समाजाला न्याय मिळण्याची मागणी... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

22/07/2023

चोपडा जैन समाजातर्फे जैन मुनीश्री हत्येचा प्रशासनाला निवेदन ; अल्पसंख्याक शांतता व अहिंसावादी समाजाला न्याय मिळण्याची मागणी...

चोपडा (प्रतिनिधी) : - -
           चोपडा जैन समाजातर्फे जैन मुनीश्री हत्येचा प्रशासनाला निवेदन ; अल्पसंख्याक शांतता व अहिंसावादी समाजाला न्याय मिळण्याची मागणी...
         समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या आणि स्वकल्याणाबरोबर परकल्याणासाठी तदवत सर्व प्राणीमात्रांचे कल्याण व्हावे अशी भावना मुनिश्रींची सदैव असते असे अहिंसा पालन करणारे जैन मुनिश्रींची समाजकंटकांनी आचार्य प.पू श्री 108 कामकुमार नंदिजी महाराज कर्नाटक राज्यात बेळगांव जिल्ह्यात चिकोडी तालुक्यात नंदी पर्वत स्थित जैन तीर्थावरती स्थित असलेले आचार्य पूज्य श्री कामकुमार नंदीजी महाराज यांची निर्घुन हत्या करण्यात आली. हत्याऱ्यांनी मृत शरीराचे तुकडे तुकडे करून बोरवेल मध्ये फेकून क्रूरतेची सर्व सीमा ओलांडलेल्या होत्या. स्वतंत्र भारतात ह्या हत्या कांडने देशाच्या गौरवशाली इतिहासावर लांझन लागले.
         या घटनेमुळे भारतातील नाही तर जगातील संपूर्ण जैन समाजात असंतोष पसरला आहे. चोपडा सकल जैन समाजातर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात सदर माहितीचा उल्लेख करण्यात आले असल्याची माहीती भविष्यात सर्व जैन मुनिश्रींची सुरक्षा कायम राहावी यासाठी निवेदन देण्यात आले त्यात केवळ पुरुषांचे स्वाक्षऱ्या नसून महिलाही पुढे सरसावल्या त्यांनी सुद्धा निवेदनात स्वाक्षरी करून निषेध व्यक्त केला पुढे म्हणाल्या अनेकांचे श्रद्धास्थान असलेले जैन तपस्वी त्यागीवृंद संतामुळे भारताची संस्कृती टिकलेली असून ऋषी कृषी प्रधान देशात संतांचे हत्या होत असतील तर ही मोठी दुर्दशाची गोष्ट आहे
          मुळातच भारत संतांची पवित्र पावन भूमी आहे. भारतीय संस्कृतीवर साधू संतांचा मोठा प्रभाव आहे. विश्वबंधुत्वाच्या भावनेला बळकट करण्यामध्ये जैन तपस्वी वृंदाचे नाव अग्रक्रमाने येते साधुसंत हे राष्ट्रीय संपत्ती आहे अश्या संपत्तीचे हत्या होणे ही मोठे दुर्भाग्य म्हणावे लागेल
          जैन समाज हा अल्पसंख्यांक असून शांतता व अहिंसावादी आहे जैन समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आम्हाला सहकार्य करून योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती निवेदनात केली आहे. मुनीश्रींचा हत्येचा कट ज्यांनी रचला त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी ही चोपडा सकल जैन समाजाने केली आहे.
          यावेळी श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदीर संस्थान चोपडा, श्री 1008 चंद्रप्रभु महाराज दिगंबर जैन मंदीर संस्थान चोपडा,श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रीसंघ चोपडा, तारण तरण जैन समाज चोपडा आदी समाजाचे गणमान्य उपस्थित होता .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp