राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वेळोदे तर्फे रक्तदान शिबिर संपन्न .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

22/07/2023

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वेळोदे तर्फे रक्तदान शिबिर संपन्न ....

चोपडा (प्रतिनिधी) : - -
           राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वेळोदे तर्फे रक्तदान शिबिर संपन्न ....
           चोपडा तालुक्यातील वेळोदे येथील श्रीराम मंदीर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नेताजी सुभाषचंद्र बोस शाखा, वेळोदे व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 
          सर्व प्रथम यावेळी प्रभू श्रीरामांचे पूजन करून आणि भारत माता, गोळवलकर गुरुजी, डॉ. हेडगेवार व छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी रक्तदानासाठी अनेर परिसरातील गलंगी, घोडगाव, हिसाळे, भवाळे, कूसुंबे, अनवर्दे, दगडी, मोहीदा, विटनेर व वेळोदे येथिल रक्तदात्यांनी रक्तदानाचे मौलिक कार्य केले तसेच गुरुदत्त टेन्ट हाऊस, वेळोदे व गोळवलकर रक्तपेढीचे कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. सरतेशेवटी डॉ वैद्य यांनी सिकलसेल व थैलेसिमिया अशा गंभीर आजारां विषयी मार्गदर्शन केले व रक्तदानाचे जीवनात काय महत्त्व आहे
            याबद्दल सविस्तर माहिती दिली. रक्तदानामुळे कोणत्याही अज्ञात इसमाचे प्राण वाचवायला आपले रक्त काम येऊ शकते. त्यावेळी संबंधित इसमाचे परिवार वाले आपणास दुवा आणि आशिर्वाद देत राहतो. तसेच दर तीन महिन्या नंतर आपण रक्तदान करू शकतो. यासाठी न घाबरता आपण रक्तदान करू शकता असे हि प्रतिपादन डॉ. वैद्य यानी केले सर्व रक्तदात्यांचे  वेळोदे शाखेने आभार व्यक्त केले.. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व स्वयंसेवकांनी व कार्यकर्ते बंधूंनी कठीण परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp