चोपडा महाविद्यालयात विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्सवात साजरा....
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयात आज रोजी 11 वी च्या विद्यार्थ्याच्या स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. डि.ए.सूर्यवंशी, प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉ.ए. एल. चौधरी होते. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच माजी शिक्षणमंत्री कै. आक्कासाहेब शरदचंद्रीका सुरेश पाटील व कै. दादासाहेब सुरेश जी. पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमाची सुरूवात स्वागत गीताने झाली. प्रास्ताविकात उपप्राचार्य प्रा.एस.पी. पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यामध्ये महाविद्यालयाततील विविध विभागातील यशस्वी विद्यार्थी,NEET परीक्षे द्वारे MBBS.साठी निवड झालेले विद्यार्थी, JEE परीक्षेद्वारे नामांकित इंजीनियरिंग कॉलेजला गेलेले विद्यार्थी UPSC, MPSC, पोलीस भरतीसाठी निवड झालेले विद्यार्थी खेळात प्राविण्य मिळालेले विद्यार्थ्याची माहिती दिली. व महाविद्यालयालयाचे पर्यवेक्षक प्रा.ए. एन. बोरसे यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची माहिती NEET / JEE / CET परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ. ए. एल. चौधरी यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या भौतिक सुविधा पुरवलेल्या आहेत तसेच वेगवेगळे राबविण्यात येणारे उपक्रम, स्पर्धा परीक्षा यांची माहिती दिली.यावेळी समन्वयक प्रा. पी.एस. पाडवी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या यशाची माहिती स्लाईड शो तयार करण्यासाठी प्रा. भुषण पाटील मेहनत घेतली. कार्यक्रमात नृत्य, गायन, शेला पागोटे असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. याप्रसंगी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला त्याची सुरुवात शुभारंभ या गीतातून झाली
यात इयत्ता अकरावी व बारावी च्या विद्यार्थिनी राजश्री व उर्वशी, रूचीका ग्रूप मखना गीत, वैष्णवीगृप What zumka, uniqe girls कमरीया, नम्रता गृप , आरती खुशी याद पीयाकी आनेलगी, हेमांगी दिलसे बधी डोर, दिलबरो, सोनल खंडेराया. झाली माझी दैणा, गायत्री ग्रूप झुमकावाली पोर, झिगाट तृप्ती व रिया मखना , कृष्णजन्मला. पलक सय्या सय्या, सलोनी , कोमल गुण गुणारे. वैभवी परम सुंदरी, नृत्याविष्कार तसेच अनुष्का कविता गायन प्रगीतीने गीत गायन केले. प्रा. आर. आर. बडगुजर, प्रा अतुल पाटील यांनी देखील गीत गायन केले. शेला पागोटे वाचन प्रा. राजश्री निकम , प्रा. शिरीन सय्यद यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. दिपाली पाटील व प्रा. पुष्पा दाभाडे यांनी केले. आभार प्रा. किर्ती मोरे यांनी मानले. विद्यार्थ्यानी कार्यक्रमाचा पुरेपुर आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अनिता सांगोरे प्रा. कांचन पाटील, प्रा. धनश्री पाटील, प्रा. सुवर्णा पवार, प्रा.आरती बोरसे, प्रा. आर. ई. लांडगे, प्रा. डाॅ. डि. ए. तायडे, प्रा. एन. बी. शिरसाट, प्रा. आर. आर. पवार, प्रा. पी. व्ही. पाटील, प्रा.समाधान पाटील, प्रा. शिरीष ठाकरे, प्रा. सचिन पाटील, प्रा. जयेश पाटील, प्रा सौरभ जैन, प्रा रोहन पाटील, राकेश काविरे, धिरज पाटील यांचे सहकार्य लाभले.

No comments:
Post a Comment