यश हे फक्त कठोर परिश्रमाचे फळ आहे : - श्री. महेंद्र पाटील (आगार प्रमुख चोपडा) - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

02/08/2023

यश हे फक्त कठोर परिश्रमाचे फळ आहे : - श्री. महेंद्र पाटील (आगार प्रमुख चोपडा)

चोपडा (प्रतिनिधी) : - -
          यश हे फक्त कठोर परिश्रमाचे फळ आहे : - श्री. महेंद्र पाटील (आगार प्रमुख चोपडा)
           चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी  दिनांक 1 व 2 ऑगस्ट रोजी 'स्वागत समारंभ' आयोजित करण्यात आला होता.
         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सुर्यवंशी उपस्थित होते तर उद्‌घाटक म्हणून चोपडा येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागाचे आगार प्रमुख श्री.महेंद्र पाटील हे उपस्थित होते.
          या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस.पी. पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. डॉ. शैलेशकुमार वाघ,  दिपक सोमाणी, सौ.माया शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक ए.एन. बोरसे व समन्वयक पी. एस. पाडवी उपस्थित होते.
           या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी महेंद्र पाटील आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की,  'यशाचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे कठीण मेहनत'. यावेळी त्यांनी आई वडिलांच्या कष्टाचे साफल्य होण्यासाठी मेहनतीचा सल्ला दिला तसेच वेळ व शिक्षण यांची योग्य तळजोड करुन यशस्वी व्हा, अशा शुभेच्छा दिल्या.
            या कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता 11 वी व 12 वी  च्या  विद्यार्थांनी आपल्या सुप्त कला गुणांना उजाळत विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. डी. ए. सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.   
            या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिपाली पाटील, पुष्पा दाभाडे यांनी तसेच इयत्ता 12 वी वाणिज्य विभागाच्या विद्यार्थीनींनी केले तर आभार संदीप देवरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp