ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

02/08/2023

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

चोपडा (प्रतिनिधी) : - -
          ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
          चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लोकमान्य टिळक आणि  शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
           कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल, शाळा समन्वयक अश्विनी पाटील, दिप्ती पाटील, सुचिता पाटील, किर्ती चौधरी, जगदीश पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रभावी नेतृत्व करणाऱ्या बाळ गंगाधर टिळक यांनी शिक्षक, समाजसुधारक, क्रांतिकारक, पत्रकार, लेखक अशा विविध भूमिकांमधून जनजागृती केली. टिळकांच्या जीवनातील विविध प्रसंगांविषयी शाळेतील शिक्षिका सुचिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.
         तसेच शाळेतील शिक्षिका वैशाली गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध झालेले तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठेंची साहित्यिक कारकीर्द, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांनी दिलेले योगदान, त्यांच्या बालपणाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.
           टिळकांच्या बालपणा पासून ते आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंतच्या विविध प्रसंगांचे सादरीकरण आपल्या वक्तृत्वातून करून  विद्यार्थ्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. वक्तृत्व स्पर्धा 3 गटात विभागण्यात आली होती.
           इयत्ता 3 री आणि 4 थीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांचे बालपण व टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव - शिवजयंती या विषयांवर वक्तृत्व सादर केले. इयत्ता 5 वी आणि 6 वीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांचे ग्रंथ प्रेम आणि लोकमान्य टिळकांच्या चरित्रातील प्रेरणादायी घटना या विषयांवर वक्तृत्व सादर केले. इयत्ता 7 वी  आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांनी टिळक : भारतीय असंतोषाचे जनक आणि लोकमान्य टिळकांचे शेतीविषयक विचार या विषयांवर वक्तृत्व सादर केले.
          इयत्ता 3 री आणि 4 थीच्या गटात हर्षाली किरण पाटील, जयेश गिरीश महाजन, विशाखा प्रमोद पाटील आणि शौर्य शिरीष ठाकरे हे विद्यार्थी विजयी झाले. इयत्ता 5 वी आणि 6 वीच्या  गटात जय गजानन पाटील, आराध्या चंद्रशेखर वानखेडे, कुशल चंद्रकांत देवरे आणि अन्वी सुधीर पाटील हे विद्यार्थी विजयी झाले. इयत्ता 7 वी  आणि 8 वीच्या गटात दक्ष प्रवीण जैस्वाल,आर्या मनोहर सोनवणे आणि भावेश प्रवीण बागुल हे विद्यार्थी विजयी झाले. स्पर्धेचे परीक्षण अमन पटेल, अश्विनी पाटील, जयश्री सूर्यवंशी आणि कीर्ती चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  पंचशिला वाघ यांनी केले. शाळेतील कलाशिक्षक देवेंद्र बारी यांनी उत्कृष्ट फलक रेखाटन केले.
         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp