जयश्री दादाजी हायस्कूल येथे महसुल व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संवाद साजरा . . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

02/08/2023

जयश्री दादाजी हायस्कूल येथे महसुल व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संवाद साजरा . . . .

चोपडा (तांदलवाडी - प्रतिनिधी) : - -
           जयश्री दादाजी हायस्कूल येथे महसुल व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संवाद साजरा
           तांदलवाडी येथील जय श्री दादाजी हायस्कूल येथे महसूल व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संवाद साधला गेला. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त व्हावी, नागरिकांना या योजनांचा योग्य लाभ घेता यावा तसेच त्याबाबत जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजा बद्दल विश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उद्देशाने 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.
          या सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी शाखेचे मुख्याध्यापक ए. एल. चव्हाण सर , मंडळ अधिकारी श्री आर जे बेलदार, तलाठी एल बी हिंगे, निमगव्हाण येथील तलाठी कल्पेश कुवर, चहार्डी - अकुलखेडा येथील तलाठी कुलदीप पाटील, तलाठी मुकेश देसले, घाडवेल येथील तलाठी गजानन पाटील , चोसाका संचालक गोपाल धनगर, तांदळवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रविण धनगर, तांदळवाडी विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन दिपक पाटील, निमगव्हाण येथील पोलीस पाटील पवन भिल्ल, दोंदवाडे येथील पोलीस पाटील नितीन पाटील, दिनेश भास्कर सपकाळे सरपंच निमगव्हाण , संजय बिहाडे उपसरपंच निमगव्हाण, धनराज पाटील ग्रामपंचायत सदस्य निमगव्हाण यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          दि. 2 ऑगस्ट रोजी तांदळवाडी येथील जय श्री दादाजी हायस्कूल येथे युवा संवादाचे आयोजन महसूल विभागाकडून करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध दाखल्याबाबत ऑनलाईन प्रक्रियांची माहिती देण्यात आली, शेतक-यांना सातबारा पोटखराब दुरुस्ती, तर 18 वर्ष पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे अशी माहीती मंडळ अधिकारी आर.जी.बेलदार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून दिली.
           महसूल सप्ताहांतर्गत विभागातर्फे दि. 1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जनसामान्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून ते सोडवण्या साठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
          यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे व शेतकऱ्यांना सातबा-याचे वितरण करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp