ना कोणी वाली - ना कोणी नाथ चहार्डी गावाला घोषित करा अनाथ ... जिल्हा परिषदचे सी.ई.ओ. यांना आम आदमी पार्टी तर्फे निवेदन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

23/08/2023

ना कोणी वाली - ना कोणी नाथ चहार्डी गावाला घोषित करा अनाथ ... जिल्हा परिषदचे सी.ई.ओ. यांना आम आदमी पार्टी तर्फे निवेदन

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

            ना कोणी वाली - ना कोणी नाथ

चहार्डी गावाला घोषित करा अनाथ ...  जिल्हा परिषदचे सी.ई.ओ. यांना  आम आदमी पार्टी तर्फे निवेदन 

         जळगाव जिल्हा आम आदमी पार्टी तर्फे चहार्डी गावा संदर्भात निवेदन देण्यात आले.

          चोपडा तालुक्यातील 2 नंबर लोकसंख्या असलेले हे गाव आहे या गावांमध्ये ग्रामसेवक सतत गैरहजर असल्यामुळे तिथल्या नागरिकांना सुविधा मिळत नाहीत , जसे की उतारे, दाखले, गावातील समस्या साफसफाई , उघड्यावरील मैला नदीत वाहून जातो त्यामुळे नळाचा पाण्याचा रिपोर्ट दूषित आलेला असून तरी देखील ग्रामसेवक , सरपंच इतर कोणीही कारवाई करीत नाही यामुळे गावकरी पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत.

           ग्रामपंचायत मधील कामगारांचा पगार स्थगित असल्यामुळे कामगार कामावर येत नाहीत व दिव्यांग बंधू भगिनी यांना निधी मिळाला नसून दिव्यांग वंचित आहेत व विविध प्रकाराच्या गावातील समस्या इत्यादी बाबी करिता गावासाठी पूर्ण वेळ ग्रामसेवक यांची नियुक्ती करावी.

           या संदर्भामध्ये आम आदमी पार्टीचे साखळी उपोषण ९ ऑगस्ट पासून आजच्या दिवसापर्यंत सुरू आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा नागरी सुविधां करिता ग्रामस्थांना आंदोलन सुरू ठेवावे लागले तसेच चोपड्याचे  बी.डी.ओ.नी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही .

         यामुळे गावकऱ्यांना तीव्र आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे व आपण मुख्य सी.ई.ओ वेळेत वेळ काढून चहार्डी गावाला न्याय दयावा अन्यथा चोपडा तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले चहार्डी गावाला अनाथ गाव म्हणून घोषित करावे अशी मागणी जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन द्वारे करण्यात येत आहे .

          या निवेदन देण्या प्रसंगी उपस्थित जळगाव जिल्हा अध्यक्ष मिलिंद चौधरी. माजी जळगाव शहर महानगर कार्य अध्यक्ष योगेश हिवरकर , मीडिया प्रमुख योगेश भोई , डॉ अनुजा पाटील , सरिता तायडे , डॉ नारायण आटकोरे , पवन खंबायत , ओम प्रकाश अग्रवाल , मुकुंदा बराटे , भीमराव मोरे , विठ्ठलराव साळुंखे , समाधान बाविस्कर, सुधीर पाटील , आर डी पाटील आदी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp