चोपडा (प्रतिनिधी) : - -
सेवा शिक्षक मंडळाचे 22 व्या वर्षाचे शिक्षक पुरस्कार जाहीर . . .
जिल्हा परिषदेने दोन दशकांपूर्वी माध्यमिक विभागाचे शिक्षक पुरस्कार वितरण बंद केलेत, तेव्हा गेल्या 21 वर्षांपासून शिक्षक दिनानिमित्त चोपडा येथील सेवा शिक्षक मंडळ माध्यमातून तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहनपर ' शिक्षक गौरव ' पुरस्कार देण्यात येतात .
सेवा शिक्षक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विलास पं. पाटील व खेडीभोकरीकर ॲड.डी.पी. पाटील यांच्या परिवारा तर्फे स्व.शांताई व पिता कै.पी.के. पाटील स्मरणार्थ 3 विभागात दिल्या जाणाऱ्या 'सेवा शिक्षक गौरव ' पुरस्काराचे हे 22 वे वर्ष असून या वर्षाचे पुरस्कारार्थी खालील प्रमाणे - -
1 ) श्री.संजय बळीराम बागुल - सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळा, चहार्डी .( प्राथमिक विभाग )
2 ) श्री .नवल प्रल्हाद महाजन - कै .झि.तो.महाजन माध्यमिक व श्री. ना. भा. पाटील उच्चमाध्यमिक विद्यालय, धानोरा ( माध्यमिक विभाग )
3 ) श्री. संजय पुंडलिक बाविस्कर - श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्य. हायस्कूल, हातेड ( क्रीडा विभाग )
दरवर्षी शिक्षक दिनी घोषणा व यथावकाश पुरस्कार वितरण केल्या जाणाऱ्या या सेवा शिक्षक गौरव पुरस्कारांची घोषणा सेवा शिक्षक मंडळ संस्थापक सेवा निवृत्त मुख्याध्यापक विलास पं पाटील, मुख्या. नरेंद्र भावे, मुख्या. एच. बी. मोरे, मुख्या मंगेश भोईटे, पर्यवेक्षक साहेबराव पाटील व संजय बारी यांनी केली आहे .
WhatsApp
No comments:
Post a Comment