चोपडा (प्रतिनिधी) : - -
चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित, प्रताप विद्या मंदिर, चोपडा येथील कलाशिक्षक कमलेश अशोक गायकवाड यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्र " गुरु गौरव " हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
" कलाशिक्षक " या कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून, आर्ट बिटस् फौंडेशन पुणे कडून कला क्षेत्रात नवोदित कलाकार घडवण्यासाठी तसेंच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करणाऱ्या कला शिक्षक, संगीत शिक्षक, नाट्य प्रशिक्षक, नृत्य शिक्षक, आणि इतर कला शिकवण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या अनुभवी गुरुतुल्य व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारामुळे कमलेश अशोक गायकवाड कलाशिक्षक प्रताप विद्या मंदिर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या पुरस्काराची माहिती देतांना आर्ट बिटस् फौंडेशन पुणे या संस्थेचे संस्थापक, संचालक संतोष पांचाळ म्हणाले की एकूण सहा कला विभागात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात, त्यासाठी महाराष्ट्रातून कला क्षेत्रातील अनेक जण आपली माहिती पाठवतात. त्यातून विशेष कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात येते.
आर्ट बिटस् ही संस्था गेली 23 वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला अशा सर्वच विभागातील कला कलाक्षेत्रातील कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने काम करीत आहे.
या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तळागाळातील कलाकारांसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध दिला आहे. त्यामुळे आपली कला जगभरात पोहचली जाते. कलाशिक्षक, चित्रकार - कमलेश गायकवाड यांच्या भावी वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
WhatsApp
No comments:
Post a Comment