ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त माता व बालकांचे उत्कृष्ट सादरीकरण - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

07/09/2023

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त माता व बालकांचे उत्कृष्ट सादरीकरण

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त माता व बालकांचे उत्कृष्ट सादरीकरण

          चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शाळेतील पूर्व प्राथमिक विभागात माता व त्यांचे पाल्य यांनी एकत्रित रित्या कृष्ण व माता यशोदा यांच्या वेशभूषेमध्ये विविध गुणदर्शन घडविणारे सादरीकरण केले. आकर्षक नाटिका, सुमधुर गीत व सुरेख नृत्य यांसारख्या विविध गुणदर्शक कला प्रकारांद्वारे भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे सादरीकरण केले.

           कार्यक्रमाची सुरूवात  मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल, के जी विभागाच्या समन्वयिका सुचिता व्ही. पाटील, कला विभाग प्रमुख दिपाली पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आली . शाळेतील शिक्षिका जुईली ठाकरे यांनी भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील विविध प्रसंगांविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत राधा कृष्णाची  वेशभूषा करून नृत्य सादर केले.  

          राधा - कृष्ण वेशभूषा स्पर्धेमध्ये प्ले ग्रुप चा जक्ष धीरज पाटील हा विद्यार्थी विजयी ठरला. नर्सरीच्या गटातून चिन्मय अमोल पाटील हा विद्यार्थी विजयी ठरला. जूनियर केजी च्या गटातून अर्णव प्रफुल्ल पाटील, हर्षा अक्षय पाटील आणि विहान  विशाल पाटकर हे विद्यार्थी विजयी ठरले. सिनियर केजीच्या गटातून आरोही सोमनाथ कासव व अर्णव अनय देशपांडे हे विद्यार्थी विजयी ठरले. या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे परीक्षण शाळेतील शिक्षिका दिपाली पाटील आणि सुचिता पाटील यांनी केले.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका माधुरी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन सोनाली देवरे , शितल भावसार , मनिषा चौधरी आणि रागिनी धनगर यांनी केले.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp