पोलिस स्वतःच्या परिवारा सह गणपती विसर्जनाचा आनंद घेईल ; असे विसर्जन होईल ; तेव्हाच आदर्श विसर्जन समजावे --- एस. राजकुमार - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

15/09/2023

पोलिस स्वतःच्या परिवारा सह गणपती विसर्जनाचा आनंद घेईल ; असे विसर्जन होईल ; तेव्हाच आदर्श विसर्जन समजावे --- एस. राजकुमार


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          पोलिस स्वतःच्या परिवारा सह गणपती विसर्जनाचा आनंद घेईल ; असे विसर्जन होईल ; तेव्हाच आदर्श विसर्जन समजावे --- एस. राजकुमार 

         पोलिस प्रशासनाकडून कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही घेत असतो परंतु गणपती मंडळाकडून ही तितकेच सहकार्य आम्हाला मिळावे. ही अपेक्षा आहे आमची अपेक्षा तर इतकी आहे की पोलीस प्रशासनातील अधिकारी हा आपल्या परिवारा सोबत गणपती विसर्जानात सामील होईल आणि तोही आनंद घेईल तो पर्यंत खरा आदर्श विसर्जन सोहळा होऊच शकत नाही असे उदगार पोलीस अधीक्षक एस. राजकुमार यांनी चोपडा येथिल कै. शरदचंद्रीका नाट्यगृहात झालेल्या शांतता कमेटीच्या बैठकित ते बोलत होते. 

           यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, प्रांतअधिकारी एकनाथ भंगाळे, सहा.पोलीस अधीक्षक चोपडे, डीवायएसपी. ऋषिकेश रावले, मुख्यधाकारी हेमंत निकम, पोलीस निरीक्षक के.के. पाटील, पोलीस निरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर, आदी प्रशासनाचे अधिकारी हजर होते.


         यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावे शेवटचे 2 तास वाढवून मिळावे. आणि अतिउत्साही मध्ये मंडळाच्या पदाधिकारी कडून थोडी फार चूक झाली तरी आपण गुन्हे दाखल करू नका आमच्या कडून तुम्हांला त्रास होईल असे कोणतेही काम करणार नाही याची ग्वाही देतो. 

         तसेच माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी देखील आपले विचार मांडले. तसेच पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. यावेळी भटू पाटील, सलीम कुरेशी, अनिल वानखेडे, गजेंद्र जैस्वाल, प्रदीप पाटील, डॉ. रवी पाटील, घनश्याम अण्णा पाटील, आदिंनी येणाऱ्या अडचणी प्रशासना समोर मांडल्या रोटरी क्लब चोपडा निर्माल्य बॉक्स देणार आहे. व स्वतः गोळा करून घेणार आहेत एकंदरीत शांतता समितीची बैठक शांततेत पार पडली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp