ईनरव्हील क्लबतर्फे ' रंगिला सावन ' महोत्सवात मंगळागौर समूह नृत्य स्पर्धा संपन्न . . .
चोपडा येथील ईनरव्हील क्लबतर्फे गत वर्षी प्रमाणे यंदाही मंगळागौर समूह नृत्य स्पर्धा संपन्न होऊन त्या नारीशक्ती गृपने प्रथम क्रमांक पटकावला तरबाईपण भारी देवा गृपने द्वितीय तर पार्लर असोसिएशन गृपने तृतीय क्रमांक पटकावला. सालाबादाप्रमणे यंदाही न.प. नाट्यगृह मध्ये रंगीला सावन कार्यक्रम उत्साहात! संपन्न झाला.शहर व तालुक्यातील अनेक महिला व युवती गृपने यात सहभाग नोंदवला.
याप्रसंगी मंगळागौर स्पर्धा गटात रिदम गृप व आदिशक्ती गऋपलआ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. तसेच गृपडान्स स्पर्धा गटात सिनिअर लेडीज गृपने प्रथम तर लाडवंजारी गृपने द्वितीय तर अप्सरा गृपने व बाईपण भारी देवा गृपने उत्तेजनार्थ बक्षिसे पटकावली . कार्यक्रमाचे शुभारंभ डिस्ट्रिक्ट चेअरमन शिलाताई देशमुख यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आला. तर माजी डिसी अश्विनी गुजराथी, सौ. प्रभाबेन गुजराथी, आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. स्पर्धा परिक्षक म्हणून शिलाताई देशमुख, अवनी गुजराथी यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्लब अध्यक्ष मीना पोतदार, सचिव नितु अग्रवाल, सीसी डॉ.कांचन टिल्लू, प्रोजेक्ट चेअरमन अंजली देशमुख, कल्पना जाधव, पुनम गुजराथी, निता अग्रवाल, वंदना पाटील, चेतना बडगुजर, सिमा पाटील, सोनल जैन, रूपाली पाटील, सोनल शहा आदी क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास हजारांहून अधिक महिला , युवती उपस्थित होत्या.
WhatsApp
No comments:
Post a Comment