गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा डंका.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

18/09/2023

गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा डंका....


 जळगाव (प्रतिनिधी) : - -

          गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा डंका....

          जळगाव येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ. 12 वी कला शाखेचा विद्यार्थी चि.समर्थ पुरुषोत्तम पाटील याने नुकत्याच पार पडलेल्या गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या कर्णमधुर स्वरांच्या जोरावर संपूर्ण राज्यातून तृतीय क्रमांक संपादित केला.


          त्याला सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख 701 रुपयांचे पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदर स्पर्धेचे आयोजन अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मिरज संलग्नित व गोदावरी फाउंडेशन, जळगाव संचलित गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या वतीने दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आले होते. समर्थ पाटील यास संगीत विभागाचे शिक्षक वृंद प्रा.देवेंद्र गुरव, प्रा.कपिल शिंगाणे प्रा.मयुरी हरीमकर यांनी मार्गदर्शन केले. तो ओरियन सी.बी.एस.ई. शाळेच्या संगीत शिक्षिका श्रीमती. सोनाली शिरसाळे यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या यशाबद्दल आज कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.श्रीमती के.जी.सपकाळे यांच्या शुभहस्ते, पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे, तिन्ही शाखांचे समन्वयक प्रा.सौ. स्वाती बऱ्हाटे, प्रा.श्री. उमेश पाटील, प्रा. श्री. प्रसाद देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी सर्व शिक्षक बंधू - भगिनी उपस्थित होते.

         समर्थाच्या यशाने महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत श्री.नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे, संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक श्री.शशिकांत वडोदकर व सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विशेष अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp