चोपडा (प्रतिनिधी) : - -
चोपड्यात व्यंकटेश बालाजी संस्थानचा बुधवारी दि. 25 रोजी रथोत्सव जल्लोषात साजरा होणार . . . .
रथावर लांबून केळी न फेकण्याचे संस्थानकडून आवाहन
चोपडा येथील रथोत्सवाला सुमारे साडेचारशे वर्षापेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या श्री व्यंकटेश बालाजी संस्थान च्या वहन उत्सव व शेवटच्या दिवशी बालाजींना रथावर आरूढ करून रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतो.
चोपडा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातून व शेजारील असलेल्या मध्यप्रदेशातूनही भाविक भक्त बालाजीच्या दर्शनासाठी येत असतात. यावर्षी बुधवारी दि. 25 रोजी हा रथोत्सव साजरा होणार असल्याचे श्री बालाजी संस्थांचे अध्यक्ष प्रवीणभाई गुजराथी व संस्थानचे पदाधिकारी यांनी कळविले आहे.
तसेच रथोत्सव ज्यावेळेस शहरात सुरू असतो त्यावेळेस भाविक भक्त रथावर लांबूनच केळी फेकत असतात. रथावर असलेले पुरोहित पुजारी यांच्या अंगावर केळी चा मार बसतो. तसेच सदर केळी खाली पडतात, म्हणून प्रसाद रुपी केळी रथाजवळ येऊन द्यावेत व पुन्हा भाविकांना प्रसादही परत दिला जाईल. म्हणून केळी फेकून मारू नये असे आवाहन श्री बालाजी संस्थानचे अध्यक्ष प्रवीणभाई गुजराथी व पदाधिकारी यांनी केले आहे.
WhatsApp
No comments:
Post a Comment