परिस्थिती असताना कर्ज फेड न करणे यात फक्त बॅंकचे नुकसान नव्हे तर समाजाचे नुकसान होय - - अरुणभाई गुजराथी - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

28/10/2023

परिस्थिती असताना कर्ज फेड न करणे यात फक्त बॅंकचे नुकसान नव्हे तर समाजाचे नुकसान होय - - अरुणभाई गुजराथी

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          परिस्थिती असताना कर्ज फेड न करणे यात फक्त बॅंकचे नुकसान नव्हे तर समाजाचे नुकसान होय - - अरुणभाई गुजराथी

          समाजातील गरीबी हटवायची असेल तर कर्ज नियमितपणे फेडणे पैश्याचे रोटेशन फिरणे महत्त्वाचे आहे यात सर्वांची प्रगती होत असते. असे प्रतिपादन अरुणभाई गुजराथी यांनी चोपडा पीपल्स को-ऑप बँक लि. 85 व्या वर्धापन दिन सोहळा निमित्त कर्जदाराचे सत्कार व " बँको ब्ल्यू रिबीन 2022 - 23 " हा पुरस्कार प्राप्त झाल्याचा पुरस्कार वितरण सोहळा पीपल्स बॅंकेच्या हॉल येथे दि. 26 रोजी दुपारी करण्यात आला. त्यावेळी केले 

           या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी , हे तर प्रमुख वक्ते म्हणून मालेगाव येथील के. के. एम. & आसोसिएटसचे संचालक - सतिश कासलीवाल , पीपल्स बॅंकचे चेअरमन चंद्रहास गुजराथी , व्हाईस चेअरमन सुनिल जैन , संचालक नेमीचंद जैन , डॉ.सुभाष देसाई , आशिष गुजराथी , पवन गुजराथी , ऋषी गुजराथी , सुनील गुजराथी , किरण जैन , डॉ. नरेंद्र शिरसाठ , वैशाली गुजराथी , राजश्री गुजराथी , नामदेव बाविस्कर , मॅनेजर मंगेश परानजपे आदी उपस्थित होते. 

        यावेळी अरुणभाई गुजराथी पुढे म्हणाले की, पैसा हा उत्पादक पाहिजे. पत नसली तरी चालते परंतु विश्वासहर्ता पाहिजे. यावेळी त्यांनी महात्मा गांधीचे उदाहरण देत सांगितले की , गांधीच्या उशी खाली बंदूक सापडली परंतु त्यावेळी गांधीजीच्या विश्वासहर्ता इतकी होती की , सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता त्यांच्या उशी खाली बंदूक कोणी ठेवली असेल ? यांचा शोध सुरू झाला. बुध्दीमत्ता जितकी महत्त्वाची तितकीच प्रामाणिकता महत्त्वाची आहे. असे अनेक उदाहरण देत त्यांनी बँकबद्दल गौरवउदगार काढले.

        सर्व प्रथम दीपप्रज्वलन व मान्यवरांचा सत्कार बँक मार्फत  करण्यात आला. यावेळी प्रस्ताविक चेअरमन चंद्रहास गुजराथी यांनी केले बँक पाच टक्यावर एन. पी. ए. आणला आहे तो लवकर बँकेच्या नियमानुसार तीन टक्या वर घेऊन जाऊ अशी शास्वती त्यांनी दिली. 25 लाख रुपये 3 वर्षांत अडावद शाखेला झाला आहे तसेच आर्थिक वर्षाच्या शेवट पर्यंत बँकला 4 कोटी रुपयांचा नफा होईल असेही त्यांनी ठामपणे सांगितले. अश्या पध्दतीने त्यांनी बँकेच्या लेखा जोखा मांडला. 

           यावेळी नियमित कर्ज फेड करणाऱ्या कर्जदाराचा  सत्कार करण्यात आला परमानंद पाटील , कांतीलाल जैन , भटू पाटील , ओम प्रॉव्हिजन , योगेश कोठारी , यश अग्रवाल , शशिकांत पाटील , बनशी बारेला , राकेश जाधव , जावेद खाटीक , फारुक पिंजारी , अलतफा खाटीक आदी अनेक कर्जदाराचे सत्कार करण्यात आला. यावेळी कर्जदारा पैकी मधुकर जोशी , शशिकांत बाविस्कर , चदनसिंग परदेशी , अश्या अनेकांनी  मनोगत व्यक्त केले.

         प्रमुख वक्ते म्हणून सतिश कासलीवाल , यांनी आपले मनोगतातून सांगितले की , कर्ज घेतांना कश्या साठी आणि का ? व किती ? कर्ज घेत आहोत यांच्या विचार व नियोजन करायलाच हवे. ज्या कामासाठी कर्ज घेतले आहे त्याच कामासाठी वापरले तर परतफेडीला त्रास होत नाही अश्या अनेक त्रांतिक बाबी त्यांनी सांगितल्या. 

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मितेश पोतदार , मान्यवरांचे परिचय किशोर गुजराथी यांनी केले. " बँको ब्ल्यू रिबीन 2022 - 23 " हा पुरस्कार मिळण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले ते कुशल गुजराथी , मॅनेजर मंगेश परानजपे यांचा देखिल अरुणभाई गुजराथी याच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp