जळगाव जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्था चालकांनी जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेचे सभासद होण्याचे आवाहन - - रोहिणी खडसे - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

26/10/2023

जळगाव जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्था चालकांनी जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेचे सभासद होण्याचे आवाहन - - रोहिणी खडसे

 

जळगाव (प्रतिनिधी) : - -

          जळगाव जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्था चालकांनी जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेचे सभासद होण्याचे आवाहन - - रोहिणी खडसे

           जळगाव आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी भगीरथ केशरलाल सोमाणी माध्यमिक विद्यालय पिंप्राळा ता. जि. जळगाव येथे जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था चालक संघटनेची कार्यकारणीची मिटिंग कार्याध्यक्ष रोहिणीताई खडसे आयोजित केली होती सदर सभेत कार्याध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी सर्व शैक्षणिक संस्थाचालकांनी जळगाव जिल्हा संस्थाचालकांना सभासद होण्याचे आवाहन केले.

          सर्वप्रथम मीटिंगमध्ये संघटनेचे मयत सभासद तसेच शिक्षण क्षेत्रातील मयत व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर मागील सभेची इतिवृत्त मंजूर करण्यात आले पवित्र पोर्टल मध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून पवित्र पोर्टल कार्यान्वित करण्यात यावे त्याचबरोबर शिक्षक भरतीवरील बंदी तात्काळ उठवण्यात यावी कंत्राटी भरती प्रक्रिया कायमस्वरूपी थांबवावी शाळादत्तक समूह  योजना रद्द करावी थकीत वेतनेतर अनुदान तात्काळ अदा करावे त्याचबरोबर बिंदू नामावली पडताळणी प्रक्रियेला चालना देऊन नाशिक विभागीय स्तरावरून रोस्टर अद्ययावत करून तात्काळ मिळावे व त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे या संदर्भात शासन स्तरावर माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरले त्यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी रोहीणीताई खडसे यांची निवड झाल्याबद्दल संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला तसेच संस्थाचालक संघटनेचे सदस्य शैलेश राणे यांची जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी वर संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.       

सभेस अध्यक्ष जयवंतराव पाटील उपाध्यक्ष जीवन खिवसरा सरचिटणीस संजय सोमाणी चिटणीस शकील पटेल सदस्य मधुकर पवार राजेंद्र महाजन विजय कोटेचा शैलेश राणे डॉ नरेंद्र कोल्हे, घनश्याम बडगुजर बाळासाहेब देशमुख निलेश खलसे बारी जी एम महाजन प्रा सुनील गरुड आदी मान्यवर उपस्थित होते.

          संस्थाचालक संघटनेचे सदस्य होण्यासाठी मनोज वाघ 9423974751 व संस्थाचालक संघटनेचे सरचिटणीस संजय सोमाणी 9422279094 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp