" Balancing Act " पुस्तक सोशल मिडिया धारकांना ज्ञानाचा खजिनाच ; लेखक - इंजि.पवन शिरसाठ - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

30/11/2023

" Balancing Act " पुस्तक सोशल मिडिया धारकांना ज्ञानाचा खजिनाच ; लेखक - इंजि.पवन शिरसाठ

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

             " Balancing Act " पुस्तक सोशल मिडिया धारकांना ज्ञानाचा खजिनाच ; लेखक - इंजि.पवन शिरसाठ 

           सोशल मीडियाच्या पडद्यावर वर्चस्व असलेल्या इंजि.पवन संजीव शिरसाठ लिखित Balancing Act : थ्रिव्हिंग इन द सोशल मीडिया एरा या पुस्तकाची निर्मिती चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली असून अल्पावधीतच पुस्तकाने आपली छबी उमटायला सुरूवात केली आहे. नोशन प्रेसने या पुस्तकाचे प्रकाशन केले असून सोशियल मिडियाच्या चाहत्यांना ज्ञानाचा खजिनाच उपलब्ध झाला. असल्याने अमेझॉन व पोथी डॉट कॉमनेही विशेष दखल घेतली आहे.

          कु.पवन शिरसाठ हे Computer science आणि  रोबोटिक्स मध्ये दुहेरी पदवी घेत आहे त्यांनी आपले अनुभव, अंतर्दृष्टी आणि धोरणे डिजिटल युगात भरभराटीचा मार्ग दाखविण्या आटोकाट प्रयत्न केला आहे. तसेच इंटरनेटच्या संभाव्यतेचा उपयोग करून घेतला आहे, यूट्यूबपासून फेसबुक, इंस्टाग्रामपर्यंत आणि त्यापलीकडे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, वेब डेव्हलपमेंट, डिजिट मार्केटिंग आणि बरेच काही एक्सप्लोर केले आहे.

           त्यांनी सर्वस्व-प्रेरित शिक्षणाद्वारे या पुस्तकाची निर्मिती केली आहे. " Balancing Act : थ्रिव्हिंग इन द सोशल मीडिया एरा " हे पुस्तक डिजिटल लँडस्केपद्वारे एक प्रेरणादायी प्रवास करेल. पवनची कथा डिजिटल युगात स्वयंप्रेरित शिक्षणाची एक अदभूत शक्ती दर्शवते. या पुस्तकात स्क्रीनचे वर्चस्व असलेल्या जगात तुमच्या वास्तविक आणि डिजिटल जीवनात संतुलन कसे शोधायचे, सोशल मीडियावर तुमची उपस्थिती, प्रेक्षक आणि प्रभाव वाढवण्यासाठी धोरणे, गोपनीयता, सुरक्षितता आणि नैतिक ऑनलाइन वर्तनाच्या गुंतागुंतांवर नेव्हिगेट करणे, सोशल मीडिया विश्लेषणाद्वारे यश मोजण्याची कला - वैयक्तिक ब्रँडिंग आणि व्यावसायिक यशासाठी सोशल मीडियाचा फायदा घेण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

         कु.पवन शिरसाठ हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अनवर्दे खुर्द या छोट्याशा गावातील रहिवासी असून गावांचे नांव देशा पलिकडे नेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत ते सामाजिक कार्यकर्ते संजीव शिरसाठ यांचे सुपुत्र असून पत्रकार महेश शिरसाठ यांचे पुतणे आहेत. त्यांच्या पुस्तक निर्मिती बद्दल वाचकांसह दिग्गजांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

          पुस्तकाची प्रत अत्यल्प दरात उपलब्ध असल्याने आजच मिळवा आणि डिजिटल युगात सामील व्हा. असे आवाहन त्यांनी  केले आहे. पुस्तक मिळवण्यासाठी नोशन प्रेस (NotionPress.com), पोथी (pothi.com), अमेझॉन (Amazon.com) यावर उपलब्ध आहे. अथवा पवन शिरसाठ - मोबाईल नंबर 📞7756832883 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp