पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थे तर्फे विद्यार्थ्यांसाठी माईंड जिम आणि इलेक्ट्रॉनिक कॉम्प्यूटराईज यंत्र चाचण्यांचे आयोजन... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

03/12/2023

पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थे तर्फे विद्यार्थ्यांसाठी माईंड जिम आणि इलेक्ट्रॉनिक कॉम्प्यूटराईज यंत्र चाचण्यांचे आयोजन...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थे तर्फे विद्यार्थ्यांसाठी माईंड जिम आणि इलेक्ट्रॉनिक कॉम्प्यूटराईज यंत्र चाचण्यांचे आयोजन...

            आपल्या यशस्वी जीवनात येणारे अडथळे दूर करत आपल्या क्षमतांच्या परिपूर्ण वापर कसा करता येईल याबाबत शास्त्रीय पद्धतीने खास विद्यार्थी व पालकांसाठी दि. 4 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2023 दरम्यान विविध चाचण्या व मार्गदर्शनाचे आयोजन पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था मार्फत करण्यात आले आहे.

          सर्व चाचण्या मनाच्या पातळीवर घेतल्या जाणार आहेत. मनाची एकाग्रता, आकलनशक्ती, स्मरणशक्ती , तत्परता , स्थिरता, निर्णयक्षमता आदींच्या विकासासाठी उपयुक्त अशा ह्या चाचण्या आहेत. या शिबिरात एकूण 6 प्रकारच्या चाचण्या घेण्यात येणार आहे. त्यात 1) अभ्यास ताण मापन चाचणी. 2) मेंदू क्षमता मापन चाचणी. 3) स्थिरता चाचणी. 4) मेंदू बलवता चाचणी. 5) नैराश्य, चिंता ताण मापक चाचणी. 6) व्यक्तिमत्व मापक रंग चाचणी इत्यादी चाचण्या घेतल्या जाणार आहेत. मन:शक्ती प्रयोग केंद्र' ही एक आद्य आणि अग्रगण्य अशी मनावर संशोधन करणारी भारतातील एकमेव संस्था आहे. जी संस्था लोणावळा ( पुणे )  येथे कार्यरत आहे.

          सुखी जीवनासाठी विज्ञानशुद्ध, बुद्धिनिष्ठ पद्धतीचे उपाय, पाच भाषांतील अडीचशेच्या वर पुस्तके, बालसंस्कार, शिक्षक सक्षमीकरण, पालक प्रौढांसाठी विविध अभ्यासवर्ग, तारुण्य धैर्य मार्गदर्शन 60 प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स यंत्रांच्या आधारे कम्प्युटराइज्ड चाचण्या, ग्रामीण व आदिवासींसाठी विविध सेवा उपक्रम सातत्याने मनशक्ती केंद्रात चालू असतात. अभ्यासवर्ग, शिबिरे, कार्यशाळा, मेंदूशास्त्र आधारित मानस चाचण्या अशा विविध माध्यमांतून विद्यार्थी, तरुण, प्रौढ व वृद्ध यांनी आपला सहभाग मोठ्या संख्येने नोंदविला आहे.

           पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले यांनी मनशक्ती केंद्र लोणावळा येथे स्वतः शिबिराचा लाभ घेतला आहे आणि आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मनशक्ती केंद्र लोणावळा यांना आमंत्रित करून विद्यार्थी व पालक हितासाठी सदर शिबिराचे आयोजन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp