" चला किल्ल्या बनवूया..." एक दिवसीय कार्यशाळेत छोट्या विद्यार्थ्यांनी साकारला किल्ला - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

10/11/2023

" चला किल्ल्या बनवूया..." एक दिवसीय कार्यशाळेत छोट्या विद्यार्थ्यांनी साकारला किल्ला

 

जळगाव (प्रतिनिधी) : - -

          " चला किल्ल्या बनवूया..." एक दिवसीय कार्यशाळेत छोट्या विद्यार्थ्यांनी साकारला किल्ला

           के.सी.ई सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्र जळगाव आणि ओजस्विनी कला महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी " चला किल्ला बनवूया " या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या स्थापत्य कलेच्या रचनांबाबत महत्वपूर्ण माहिती देण्यात आली.

          ओजस्विनी कला महाविद्यालयातील शिल्पकार देवा सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मातीचा किल्ला बनवण्याचे प्रात्यक्षिक दिले. किल्ला बनवत असताना मातीचा प्रकार, बुरुज, तटबंदी, किल्ल्याचा मुख्य दरवाजा कमान यांची प्रात्यक्षिकातून माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांकडून कार्यशाळेत तोफ - रणगाडे, मावळे इ.ची प्रत्यक्ष सुबक निर्मिती करून घेण्यात आली. दिवाळीच्या सुट्टीत सहभागी विद्यार्थ्यांनी घरी किल्ला बनवण्याचे आश्वासन दिले असून, सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

         कार्यशाळेस केसीई सोसायटीचे सांस्कृतिक प्रमुख श्री शशिकांत वडोदकर , कान्ह ललित कला केंद्राचे संचालक प्रा.प्रसाद देसाई, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य मिलन भामरे, एटी झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे उपस्थित होते.

          कार्यशाळेच्या आयोजनास प्रा.पियुष बडगुजर, प्रा. दिगंबर शिरसाळे, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ, प्रा.देवेंद्र गुरव, शिवम चौधरी, कुणाल जाधव, भूषण भोळे, राजेंद्र सरोदे आदींचे मौलिक सहकार्य प्राप्त झाले.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp