पोलीस तुमच्या साठी सदैव तत्पर आहेत , जनतेने सहकार्य करावे या अपेक्षेसह डी. वाय. एस. पी. ऋषिकेश रावले व पो. नि. के. के. पाटील यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

12/11/2023

पोलीस तुमच्या साठी सदैव तत्पर आहेत , जनतेने सहकार्य करावे या अपेक्षेसह डी. वाय. एस. पी. ऋषिकेश रावले व पो. नि. के. के. पाटील यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          पोलीस तुमच्या साठी सदैव तत्पर आहेत , जनतेने सहकार्य करावे या अपेक्षेसह डी. वाय. एस. पी. ऋषिकेश रावले व पो. नि. के. के. पाटील यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

      🔴 शेजारी हाच खरा पहारेकरी ही संकल्पना राबवावी 🔴

🔹  दिवाळी व भाऊबीज सणाच्या निमीत्ताने बाहेरगावी जातांना मौल्यवान दागिने अथवा रोख रक्कम घरात न ठेवता दागीने लॉकर मध्ये ठेवावेत व पैसे बँकेत ठेवावेत.

🔹  गावाला जातांना घराच्या समोर आजुबाजुला व मागे पुरेसे लाईट चालू ठेवावेत.

🔹  शक्य असल्यास घराच्या अवती भोवती चांगल्या प्रतीचे सि.सि.टी.व्ही कॅमेरे बसवुन घ्यावेत ज्यांनी कॅमेरे बसवलेले आहेत त्यांनी ते चालु आहेत किंवा नाही याची खात्री करुन घ्यावी.

🔹  आपल्या कॉलनी मध्ये खाजगी सुरक्षा रक्षक नेमावेत.

🔹  गावाला जातांना शेजारी राहणाऱ्या लोकांना माहीती द्यावी आणि त्यांना आपल्या घराकडे लक्ष ठेवण्या बाबत विनंती करावी.

🔹  महीलांनी बाजारात जातांना तसेच सार्वजनीक वाहनाने प्रवास करताना सोन्या चांदीचे मौल्यवान दागीने घालुन जावु नये.

🔹  प्रवासा दरम्यान खास करुन बस मध्ये चढतांना व उतरतांना आपल्या मोल्यवान दागीन्यांची पैशांची व मोबाईल फोनची व इतर किमती सामानाची चोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

🔹  सोने चांदीचे दागिने अथवा पितळी भांडी पॉलीश करण्यासाठी दारावर आलेल्या व्यक्ती कडुन पॉलीश करुन घेवु नये आपली फसवणुक होवु शकते.

🔹  घराबाहेर जातांना महीलांनी मोल्यवान दागीने न घालता शक्यतो नकली दागीन्यांचा वापर करावा.

🔹  बऱ्याचवेळा अज्ञात आरोपी आपल्या घरासमोर येवुन आपल्याला एखादा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आपल्या जवळ येतात व आपल्या कडील सोन्या चांदीचे दागीने अथवा मौल्यवान वस्तु जबरीने हिसकावुन पळुन जातात अशा लोकांपासुन सावध रहावे.

🔹  शक्य असल्यास प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वताच्या घरासमोर अथवा लोक सहभागातुन आपल्या कॉलनी मध्ये सर्व मुख्य रस्त्यावर तसेच मुख्य चौकात सी. सी. टी. व्ही कॅमेरे बसवावे जेणे करून आपल्या कॉलनी मध्ये घरफोडी वाहन चोरी व इतर चोरीस आळा बसेल व गुन्हे उघडकीस आणन्यासाठी त्याची मदत होईल.

🔹  पोलीस विभागा कडुन खात्री करुन घेतल्या शिवाय अनोळखी व्यक्तींना घर भाडे तत्वावर देवु नये

🔹  कोणत्याही अनोळखी व्यक्तीने मी बँकेतून बोलत आहे असे म्हणुन फोन वरुन आपल्या बँक खात्याशी संबंधीत माहीती विचारल्यास कोणालाही माहीती देवु नये

🔹  कोणत्याही अनोळखी नंबर वरुन आलेल्या लिंकवर क्लिक करु नका व त्यास प्रतिसाद देवू नका तसेच आपणास लॉटरी लागलेली आहे ते पैसे आपल्या अकाऊंट मध्ये जमा होण्यासाठी आपण अगोदर दिलेल्या अकाऊंन्ट वर पैसे जमा करा अशा प्रकारच्या प्रलोभनास बळी पडुन पैसे टाकु नका

🔹  आम्ही पोलीस आहोत पुढे दंगल चालु आहे ? तुमचे दागीने काढुन पर्स मध्ये ठेवा असे सांगणाच्या साधे गणवेशातील व्यक्तीवर विश्वास ठेवून नका त्याने सांगीतल्या प्रमाणे कृती करु नका आपली फसवणुक होवु शकते.

🔹  घरातील वयस्कर व्यक्तींना बँकेतून पैसे काढुन आणन्यासाठी किंवा बँकेत पैसे जमा करणेसाठी एकट्याला पाठवु नये चोरांकडुन अशा व्यक्तीवर नजर ठेवून पैसे चोरीस जाण्याची शक्यता असते.

🔹  मोटर सायकल चोरीस आळा घालण्यासाठी बाजारात आल्यानंतर तसेच आपल्या घरासमोर किंवा ऑफिस समोर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी मोटर सायकल पार्क केल्या नंतर हॅन्डल लॉक व्यतिरीक्त आणखी एखाद्या लोखंडी साखळी व कुलुपचा वापर करावा व आपले वाहन चोरीस जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

🔹  आपल्या कपड्यावर घाण टाकुन किंवा इतर कोणत्याही प्रकारे आपले लक्ष विचलीत करुन आपल्या खिशातील पैसे व गळ्यातील दागीने किंवा आपण आपल्या कार मध्ये किंवा मोटार सायकलच्या डिक्की मध्ये ठेवलेले पैसे किंवा इतर मौल्यवान वस्तु चोरीस जाण्याची शक्यता असते.

🔹  दारावर आलेल्या अनोळखी व्यक्ती कडुन , फेरीवाल्यांकडुन कोणत्याही प्रकारच्या वस्तु विकत घेवु नये किंवा त्यांना घरात प्रवेश देऊ नये.

🔹  कोणत्याही व्यक्ती बद्दल संशय वाटल्यास किंवा आपल्या समोर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीसांना माहीती द्यावी.

🔹  आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडे घरफोडी , चोरी , वाहन चोरी किंवा इतर कोणत्याही प्रकारची अप्रीय घटना घडणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी आणि शेजारी हाच खरा पहारेकरी ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणावी.

🔹  पोलीस आपल्या मालमत्तेचे व आपल्या जिवीताचे संरक्षण करण्यासाठी सदैव तत्पर आहेत. परंतु आपण देखील सर्व नागरीकांनी दक्ष राहुन योग्य ती खबरदारी घेवुन आपल्या मालमत्तेचे तसेच आपल्या जीवीताचे संरक्षण करण्यासाठी पोलीस विभागास आपण सर्वांनी सहकार्य करावे या अपेक्षासह आपणास सर्वांना दिपावली या सणाच्या खुप खुप शुभेच्छा ऋषिकेश रावले (सहा. पोलीस अधीक्षक चोपडा उपविभाग चोपडा व के. के. पाटील पोलीस निरीक्षक चोपडा शहर पोलीस स्टेशन यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp