पंकज बोरोले यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सेवाभावी कार्यक्रमांचे 6 डिसेंबर ते 13 डिसेंबर पर्यंत आयोजन.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

07/12/2023

पंकज बोरोले यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सेवाभावी कार्यक्रमांचे 6 डिसेंबर ते 13 डिसेंबर पर्यंत आयोजन....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         पंकज बोरोले यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सेवाभावी कार्यक्रमांचे 6 डिसेंबर ते 13 डिसेंबर पर्यंत  आयोजन....

           पंकज शैक्षणिक सामाजिक संस्था तथा पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक पंकज बोरोले यांचा वाढदिवस 6 डिसेंबर ते 13 डिसेंबर यादरम्यान साजरा केला जाणार आहे. या निमित्त विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

          दि. 6 ते 11 डिसेंबर दरम्यान पंकज चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्यात 16 संघ सहभागी झाले आहेत. दि. 11 डिसेंबर रोजी प्लॅस्टिक मुक्त परिसर अभियान राबविण्यात येणार आहे.दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धा व 9 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 6 ते 12 डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यासाठी पाठांतर, गायन, वादन , नृत्य, वक्तृत्व आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. दि. 13 डिसेंबर रोजी सायं. 6 वाजता  प्रेरणादायी वक्ते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 

          पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले हे मितभाषी आणि आपल्या कामाप्रती निष्ठा असणारे व्यक्तीमत्व आहे. चोपडा शहरात आधुनिक दर्जेदार घरांची नवी संकल्पना रूजवणारे पंकज बोरोले हे स्वतः उच्चशिक्षित आहेत. त्यांनी BE मेकॅनिकल केले असून इंग्लंडमध्ये M B A केले आहे. काम करत असताना त्यांनी उच्च गुणवत्ता आणि दर्जा याला सातत्याने प्राधान्य दिले त्यामुळे आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे 8 हजाराच्यावर संतुष्ट ग्राहक आहेत. पुण्यातील व्यवसाय उत्तम चालत असताना देखील ते आपल्या मायभूमीकडे वळले.

           सामाजिक बांधिलकी जोपासणे, ग्राहकांची सेवा करणे आणि समाजासाठी सातत्याने कार्य करत राहणे ही भावना आणि शिकवण वडिलांनी  दिली आहे . त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे 1) युवकांसाठी उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार. 2) उत्कृष्ट उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी पुरस्कार. 3) समाजसेवेसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार. 4) उत्कृष्ट कुटुंब कल्याण कार्यासाठी पुरस्कार. 5) नैसर्गिक आपत्ती दरम्यान केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार. 6) सर्वोत्तम रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी पुरस्कार. 7) आदिवासींसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार. 8) उत्कृष्ट जनसंपर्कासाठी पुरस्कार.

 9) समाजातील महिलांच्या उन्नतीसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार. 10) रोटाकिड्स  रोटरी प्रांतपालांचा विशेष कौतुक पुरस्कार. 11) विवेक ग्रामीण केंद्राचा बांबू सेवक पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत.

          चोपडा तालुक्याचे आराध्य दैवत श्री महामंडलेश्वर बाल योगीजी महाराज यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp