ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा सप्ताहाचे यशस्वी आयोजन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/12/2023

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा सप्ताहाचे यशस्वी आयोजन

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा सप्ताहाचे यशस्वी आयोजन

         चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या सचिव  डॉ. स्मिता संदीप पाटील, प्रा. डॉ. क्रांती क्षीरसागर, शाळा समन्वयक प्रा.  डी. एस. पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या आणि हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. गॅसच्या फुग्यांचा वापर करून आकाशात उंचावर शाळेच्या क्रीडा फलकाचे प्रक्षेपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका क्रांती क्षीरसागर आणि शाळा समन्वयक प्रा. डी. एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 

           शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी आणि इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळांमध्ये पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी झिगझॅक रेस, जिलेबी रेस, बकेट बॉल रेस, रनिंग, फ्रॉग जंप पुस्तकाचा समतोल राखत धावणे अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास मीटर धावणे, लिंबू चमचा, फुगे फोडणे, चेंडू बादलीत टाकणे, पुस्तकाचा समतोल राखत धावणे इत्यादी खेळांचा समावेश केलेला आहे. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शंभर मीटर धावणे, दोनशे मीटर धावणे आणि चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धा तसेच लिंबू चमचा, बलून रेस, तीन पायांची शर्यत आणि गोळा फेक यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. सांघिक खेळांमध्ये क्रिकेट, थ्रो बॉल आणि बॅडमिंटन इ. खेळांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांसाठीही विविध क्रीडा स्पर्धांचे  आयोजन करण्यात आले आहे. 

          विविध क्रीडा प्रकारांसाठी विद्यार्थ्यांना शाळेचे उपमुख्याध्यापक अमन पटेल, क्रीडा शिक्षिका पूजा चौधरी आणि क्रीडा शिक्षक भूषण गुजर यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा सप्ताहाच्या अनुषंगाने शाळेतील कलाशिक्षक देवेन बारी यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. 

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील क्रीडा शिक्षिका पूजा चौधरी आणि अश्विनी ढबू यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका धनश्री पवार यांनी केले. क्रीडा स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp