Post Top Ad
Responsive Ads Here
25/12/2023

Home
Unlabelled
पंकज विद्यालयात रंग - तरंग सांस्कृतिक महोत्सव ... स्वराज्य नाटीकेचे अप्रतिम सादरीकरण
पंकज विद्यालयात रंग - तरंग सांस्कृतिक महोत्सव ... स्वराज्य नाटीकेचे अप्रतिम सादरीकरण
पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या बालसंस्कार केंद्र, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षक यांच्या सुप्त कला गुणांचा रंग - तरंग 2023 पंकज विद्यालयात 22 ते 24 डिसेंबर रोजी संपन्न झाला. सदरील कार्यक्रमसाठी उद्घाटन कवियत्री बहिणाबाई विद्यापीठ जळगाव अधिष्टाता जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, चोपडा नपा नगरसेवक जीवन चौधरी, विभागीय संघचालक राजेश पाटील, लोक व नाट्य कलावंत विनोद ढगे, संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले , गोकुळ भोळे, अविनाश पाटील, सौ.हेमलता बोरोले, दिपाली बोरोले, प्राचार्य आर आर अत्तरदे, प्राचार्य मिलिंद पाटील व केतन माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमांत विविध बालगीते, शेतकरी नृत्य, पारंपारिक गिते, श्रीराम वंदना, जोकर नृत्य, तारक मेहता का उलटा चष्मा साँग थीम, देशभक्ती गीत, कानबाई, मराठी हिंदी रिमिक्स गिते, आदिवासी नृत्य, राम अयोध्यला आ रहे, घे हरिनाम घे अशा प्रकारची विविध प्रकारच्या गितांवर विद्यार्थ्यानी धमाल नृत्य सादर केली. प्रेक्षकांची दाद मिळविली.
यशस्वितेसाठी सांस्कृतिक समितीतर्फे एकूण 23 विविध उपसमित्या प्राथमिक मुख्याध्यापक एम व्ही.पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक व्ही आर पाटील व सौ रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाने तयार करण्यात आल्या. त्यात संस्थेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अपार मेहनत घेतली. सूत्रसंचलन योगेश चौधरी यांनी केले.
Share This

About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here
No comments:
Post a Comment