जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विजया महाजन यांना दिल्लीत होणाऱ्या शासकीय संचालन कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून आमंत्रण ; जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब . . . . - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

20/01/2024

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विजया महाजन यांना दिल्लीत होणाऱ्या शासकीय संचालन कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून आमंत्रण ; जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब . . . .


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विजया महाजन यांना दिल्लीत होणाऱ्या शासकीय संचालन कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून आमंत्रण

        जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब . . . .

         दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त संचालनासाठी लासूर ता चोपडा  येथील आशा स्वयंसेविका विजया नामदेव महाजन त्यांचे जोडीदार नामदेव तुकाराम महाजन (मास्टर टेलर्स) यांना येत्या 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या शासकीय संचालन कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

        जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद, जळगाव यांच्यातर्फे विजया महाजन यांना निमंत्रण प्राप्त झाले आहे. केंद्र शासन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक गावामध्ये वैयक्तिक शौचालय , सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन , शालेय स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता , गावाचा परिसर स्वच्छता तसेच हागनदारी मुक्त गाव अश्या विविध प्रकारची कामे गाव पातळीवर प्रभाविपणे राबविण्याचे काम स्वच्छाग्रही गाव पातळीवर यशस्वी करतात अश्या स्वच्छाग्रही ना त्याच्या जोडीदारासोबत प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात संचालन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते.

         विजया महाजन ह्या लासूर ता चोपडा येथील आशा स्वयंसेविका कार्यरत असून ते आपल्या गावात त्यांनी वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी कुटुंबाना प्रवृत्त केले , तसेच सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन , शालेय स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता , गावाचा परिसर स्वच्छता तसेच हागनदारी मुक्त गाव हे विविध प्रकारची कामे त्यांनी स्वच्छाग्रही म्हणून चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्या कामाची पावती म्हणून राज्यभरातून 11 स्वच्छाग्रही ची निवड करण्यात आली असून जळगाव जिल्ह्यातील विजया महाजन यांची निवड झाल्याने जळगाव जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. 

         24 ते 26 जानेवारी दरम्यान त्यांना शासनातर्फे दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले आहे. याबद्दल महाजन दांपत्याचे परिसरातून कौतुक व या निवडी बद्दल मित्र परिवारच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज