Post Top Ad
Responsive Ads Here
20/01/2024
Home
Unlabelled
चोपड्याचे युवा चित्रकार अनिलराज पाटील निर्मित " दिव्य श्रीराम " कलाकृतीची दुबई येथील प्रदर्शनात निवड...
चोपड्याचे युवा चित्रकार अनिलराज पाटील निर्मित " दिव्य श्रीराम " कलाकृतीची दुबई येथील प्रदर्शनात निवड...
पवित्र भूमी अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्राचे प्रशस्त मंदिरात लवकरच आगमन होत आहे. या मंगलमय प्रसंगाची संपूर्ण भारतवासीयांना उत्कंठा लागली असताना आर्ट्स अँड क्राफ्ट ग्लोबल स्टार संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर भगवान श्रीराम यांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध विषय घेऊन चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत चोपडा येथील युवा कलाकार श्री अनिलराज पुनमचंद पाटील यांनी निर्मित “ दिव्य श्रीराम ” या कलाकृतीची आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात निवड झालेली आहे. हे श्रीराम जीवन चरित्र चित्रकला प्रदर्शन दुबई येथे कलादालनात प्रदर्शित केले जाणार असून यातून संपूर्ण जगाला ललित कलाद्वारे प्रभू श्री रामचंद्रांचे आदर्श तत्व जीवन व त्यांचा महिमा वृद्धिंगत केला जाणार आहे.
या अनोख्या कामगिरीबद्दल त्यांचे ललित कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र महाजन , सर्व प्राध्यापक , थोर चित्रकार चंद्रशेखर कुमावत व मिलिंद विचारे , कलाध्यापक संघ चोपडा यांनी अभिनंदन केले आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment