चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल इंडियन एजुक्येशन आयकाॅन ॲवाॅर्ड ने सन्मानित . . . . - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

21/01/2024

चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल इंडियन एजुक्येशन आयकाॅन ॲवाॅर्ड ने सन्मानित . . . .


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल इंडियन एजुक्येशन आयकाॅन ॲवाॅर्ड ने सन्मानित . . . .

         भारत सरकारच्या  सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सेन्ट्रल एज्युकेशन डेव्हलपमेन्ट ऑथिरीटी ( सीईडी फाऊंडेशन ) च्या वतीने दिल्लीच्या लीला एमबियन्स  हाॅटेल मध्ये भारत इन्स्टिट्यूटशन रँकींगचे आयोजन करण्यात आले होते. त्यात राष्ट्रीय शिक्षा निती 2020 च्या अनुकरणाच्या आधारावर संपुर्ण देशभरातुन शंभर विद्यालयांना विविध क्षेत्रात सन्मानित करण्यात आले. त्यात चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल ला 2022 - 23 मध्ये बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट यश साध्य केल्यामुळे 'एक्सलन्स अवार्ड' ने सन्मानित करण्यात आले.

         दिल्ली येथे हा पुरस्कार पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल चे प्राचार्य मिलिंद पाटील यांनी स्विकारला. सदर पुरस्कार सीईडी चे संस्थापक अध्यक्ष डाॅ. प्रियदर्शी नायक तसेच आयएयस सी.बी शर्मा , अध्यक्ष , नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग ( एनआयओएस ) , भारतातील राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मंडळ , यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

          पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल ला ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे शाळेचे सर्वदुर कौतुक होत असुन पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डाॅ. सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, सौ. दिपाली बोरोले , एम.व्ही.पाटील , व्ही.आर.पाटील , प्राचार्य आर.आर.अत्तरदे , केतन माळी , सौ.रेखा मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज