Post Top Ad
Responsive Ads Here
22/01/2024
Home
Unlabelled
रामायणआधारित नाटके रामकथेचा सृजनात्मक आविष्कार - - मंगला दिदी यांचे प्रतिपादन....
रामायणआधारित नाटके रामकथेचा सृजनात्मक आविष्कार - - मंगला दिदी यांचे प्रतिपादन....
नाटक’ हे संस्कृत साहित्याचे एक अविभाज्य अंग. विविधांगी विषयांवर आधारित संस्कृत नाटके असताना रामायण कथा त्यापासून कशी अलिप्त राहील ? रामकथेचा सृजनात्मक आविष्कार संस्कृत नाटकांमध्ये दिसतो. त्यात प्रामुख्याने ‘प्रतिमा’, ‘अभिषेक’, ‘उत्तररामचरित’ आणि ‘महावीरचरित’ या नाटकांचा उल्लेख आहे. असे प्रतिपादन चोपडा ओम शांती केंद्राच्या संचालिका मंगला दिदी यांनी रोटरी उत्सव कार्यक्रम प्रसंगी केले.
22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होत आहे त्या धर्तीवर आधारीत व श्री रामाच्या जीवनावर आधारित नाटिका चोपडा येथील ओम शांती केंद्रामार्फत दि. 19 जानेवारी ते 22 जानेवारी रोटरी उत्सवात नाटिका हुबेहूब सादरीकरण प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे... सदर नाटिका पाहताना प्रेक्षक मंत्रमुग्ध तर होतोच सोबत टाळ्यांची दाद देत कलाकारांचे कौतुक केल्याशिवाय राहत नाही. सदर नाटिकेत श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान नारद व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पात्रे लक्ष वेधून घेतात. श्रीराम चंद्र प्रभूंचा संदेश व त्यांचे कार्य , त्यांचा आदर्श याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन अश्विनी दीदी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओम शांती केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारीज मंगला दीदी, राज दीदी, सारिका दीदी, कांचन भोळे, राजेंद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील
✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
at
January 22, 2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here





No comments:
Post a Comment