पालीवाल समाजाची कुलदेवता आशापूर्णा देवीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ....
पांच दिवसीय कार्यक्रमाचा 22 फेब्रुवारी रोजी समारोप, हजारो पालीपुत्रांची उपस्थिती
मध्यप्रदेश व राजस्थान सीमेवरील श्री क्षेत्र गुराडीया येथे मां आशापूर्णा देवीचे भव्य दिव्य व नामंदिर उभारण्यात आले आहे. मंदिरातील मातेचे मुर्तिसह इतर मुर्त्याची प्रतिस्थापना दिनांक 22 फेब्रु. 2024 माघ शु ll त्रयोदशी गुरुवार रोजी 4 मुहूर्तावर संपन्न होणार असून या शुभप्रसंगी अखिल विश्वातील पाली पुत्र, तसेच अनेक साधू संत व गणमान्य राजकीय व सामाजिक नेते व कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती महाराष्ट्र पालीवाल परिषदेचे महामंत्री अनिलकुमार पालीवाल यांनी दिली.
माँ आशापूर्णा मंदिराचा परिसर दहा एकर असून त्यात भव्य भक्त निवास, उद्यान परिसर, बाल संस्कार केंद्र, स्वच्छता गृह, आदी सुविधा उभारण्यात आल्या आहे. सव्वा तीन कोटी रुपये खर्चून पालीपुत्रांच्या सहकार्याने सदर मंदिराची नवनिर्मिती करण्यात आलीआहे.
मध्य प्रदेशातील अग्रगण्य मंदिरात हे मंदिर गणले जाते. मध्य प्रदेश शासनाने रस्ते तसेच पाणीपुरवठा सुविधेसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असून जवळपास साडे तीनशे वर्ष पुरातन ह्या मंदिरात दीडशे वर्षापासून अखंड ज्योत तेवत आहे. पालीवाल समाजाचा दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळाचां सात दिवसीय कार्यक्रम ह्याच ठिकाणी शेकडो वर्षा पासून आयोजित केला जातोय.

No comments:
Post a Comment