मुस्तुफा अँग्लो उर्दू हायस्कुल मध्ये पालक सभा आयोजित...
मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचलित, मुस्तुफा अँग्लो उर्दू हायस्कुल व ज्यू. कॉलेज चोपडा या शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास प्रगती, गुणवत्ता, कॉपी मुक्त शाळा, माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत इ.5 वी ते 8 वी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा घेण्यात आली.
त्यावेळी संस्थेचे युवासंचालक अरमान अली असगर अली उपस्थित होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आपल्या पाल्यांचे दैनिक आढावा घेणे विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहणे व मैदानी खेळात उत्स्फूर्त भाग घेणे याबद्दल संदेश दिला तसेच पालकांनी आपल्या पाल्यां संदर्भात नेहमी शिक्षकांशी संवाद केले पाहिजे.

No comments:
Post a Comment